शहीद मेजर विभूतींच्या पार्थिवाला स्पर्श करुन वीरपत्नी म्हणाली – ‘I Love You’

देहरादून : पुलावामा हल्ल्यातील मास्टरमाईंडसोबत पिंगलान भागात चकमक सुरु असताना 55 राष्ट्रीय रायफल्सचे पाच जवान शहीद झाले. यात मेजर विभूती शंकर डोंडियाल सुद्धा शहीद झाले. शहीद मेजर विभूती यांच्या पार्थिवाची ज्यावेळी देहरादूमध्ये अंत्ययात्रा सुरु करण्यात आली, त्यावेळी शहीद मेजर विभूती यांच्या पत्नी निकीता कौल यांचे अश्रू थांबता थांबत नव्हते. अशातही वीरपत्नी निकीत कौल शहीद मेजर […]

शहीद मेजर विभूतींच्या पार्थिवाला स्पर्श करुन वीरपत्नी म्हणाली - 'I Love You'
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

देहरादून : पुलावामा हल्ल्यातील मास्टरमाईंडसोबत पिंगलान भागात चकमक सुरु असताना 55 राष्ट्रीय रायफल्सचे पाच जवान शहीद झाले. यात मेजर विभूती शंकर डोंडियाल सुद्धा शहीद झाले. शहीद मेजर विभूती यांच्या पार्थिवाची ज्यावेळी देहरादूमध्ये अंत्ययात्रा सुरु करण्यात आली, त्यावेळी शहीद मेजर विभूती यांच्या पत्नी निकीता कौल यांचे अश्रू थांबता थांबत नव्हते. अशातही वीरपत्नी निकीत कौल शहीद मेजर विभूती यांच्या पार्थिवाजवळ गेले आणि त्यांना स्पर्श करुन अश्रू ढाळतच म्हणाले, “आय लव्ह यू”.

मेजर विभूती शंकर डोंडियाल आणि निकीता कौल यांचं गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लग्न झालं होतं. निकीता कौल या काश्मिरी विस्थापित होत्या. 34 वर्षीय मेजर विभूती 11 वर्षांपूर्वी म्हणजे 2008 साली सैन्यात दाखल झाले. आजी, आई, तीन बहिणी आणि पत्नी असं मेजर विभूतींचं कुटुंब आहे.

उत्तराखंडची राजधानी देहरादून दु:खाच्या महासागरात आहे. दोनच दिवस आधी पुलवामा हल्ल्यानंतर आयईडी डिफ्युज करताना मेजर चित्रेश शहीद झाले. त्या दु:खातून देहरादून सावरत नाही, तोच पुलवामातील पिंगलान येथे पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाईंडसोबत चकमकीत मेजर विभूती शंकर डोंडियाल शहीद झाले.

शहीद मेजर विभूती यांचे पार्थिव देहरादूनला आणल्यानंतर अंत्ययात्रा सुरु झाली. संपूर्ण परिसर ‘भारत माता की जय’च्या घोषणाने दुमदुमू लागला. शोकसागरात बुडालेल्या गर्दीतून वीरपत्नी निकीता पुढे आल्या आणि शहीद मेजर विभूती यांच्या चेहऱ्याला स्पर्श करत म्हणल्या, “आय लव्ह यू!”

वीरपत्नी निकीता यांचा तो क्षण पाहणाऱ्यांना अश्रू अनावर झाले. अवघा परिसर हळहळ व्यक्त करु लागला. तेवढ्यात सैनिकांनी पुन्हा घोषणा दिल्या, ‘भारत माता की…जय’ आणि वीरपत्नी निकीता यांनी शहीद मेजर विभूती यांना सलाम ठोकला.

जम्मू-कास्मीर येथील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद या क्रूर दहशतवादी संघटनेने आयईडी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सीआरपीएफच्या ताफ्यातील एका गाडीला ठोकली आणि आत्महघातकी स्फोट घडवला. यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मेजर विभूती यांच्या नेतृत्त्वात चार दिवसांनंतर म्हणजे काल (18 फेब्रुवारी) पिंगलान येथे चकमक झाली. या चकमकीत मेजर विभूती शंकर डोंडियाल यांच्यासह पाच जवान शहीद झाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.