गरिबांना खायला अन्न नाही, पण हे त्यांना जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करायला सांगतात : मेहबुबा मुफ्ती
जम्मू-काश्मीरमधील साधनसंपत्ती लुटण्यासाठी त्याला तुरुंग बनवण्यात आल्याचा गंभीर आरोप पीडीपीच्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी केला आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील साधनसंपत्ती लुटण्यासाठी त्याला तुरुंग बनवण्यात आल्याचा गंभीर आरोप पीडीपीच्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी केला आहे. जम्मू-काश्मीर एक तुरुंग झालं आहे आणि येथे राजकीय नेते, पत्रकार आणि सामान्य नागरिक कुणालाच बोलण्याचं स्वातंत्र्य नाही. सर्वांचा आवाज दाबला जात आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्या आज (29 ऑक्टोबर) श्रीनगरमधील गुपकर रोड येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होत्या (Mehbooba Mufti say Modi Government make Jammu Kashmir prison to loot resources).
मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, “जम्मू-काश्मीरसाठीच्या (Jammu and Kashmir) नव्या जमीन कायद्यांविरोधात PDP च्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (28 ऑक्टोबर) जम्मूमध्ये आंदोलन केलं. यानंतर गुरुवारी PDP चे कार्यकर्ते काश्मीरमध्ये एक मोर्चा काढणार होते. मात्र, त्यांना अटक करण्यात आले आणि PDP कार्यालय सील करण्यात आलं. मी त्यांना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले, मात्र मलाही त्यांना भेटू दिलं नाही. राजकीय नेते, पत्रकार आणि सामान्य नागरिक असो काश्मीरमध्ये कुणालाही बोलण्याची परवानगी नाहीये.”
‘गरीबांना खायला अन्न नाही, पण हे त्यांना जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करायला सांगतात’
“जम्मू काश्मीरमध्ये पूर्णपणे अराजकता पसरली आहे. जम्मू-काश्मीरला तुरुंग बनवण्यात आलं आहे. त्यांना आमची साधनसंपत्ती लुटायची आहे. लडाखच्या (Ladakh) नागरिकांनी विरोध केला, तेव्हा त्यांना एका विमानाने दिल्लीत नेण्यात आलं. तेथे त्यांच्या अडचणी विचारण्यात आल्या, मात्र आता ते यावर पश्चाताप व्यक्त करत आहेत. गरीब नागरिकांना खायला अन्न दिलं जात नाही, पण त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यास सांगितलं जातंय,” असंही मेहबुबा यांनी म्हटलं.
‘आम्ही ट्विटरवरचे राजकीय नेते नाही’
मेहबुबा म्हणाल्या, “आम्ही जम्मू-काश्मीरसाठीच्या नव्या जमीन कायद्यांविरोधात बोलत राहू. आम्ही ट्विटरवरचे राजकीय नेते नाहीत. आम्ही घरात थांबणार नाही, आम्ही बाहेर येऊ. प्रत्येक दिवशी दिल्लीवरुन एक नवा लोकविरोधी आदेश दिला जात आहे. जर दिल्लीतील लोक इतकेच भक्कम आहेत, तर ते चीनचा सामना का करत नाही? चीनच्या हल्ल्यात आपले 20 जवान शहीद झाले आहेत. सर्व सैनिक केवळ जम्मू-काश्मीरच्या लोकांसाठीच आहे का?”
हेही वाचा :
‘कलम 370 हटवणे हा काश्मीरसाठी काळा दिवस’, सुटकेनंतर मेहबुबा मुफ्ती यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
मेहबुबा मुफ्तींच्या मुलीचं अमित शाहांना पत्र
Mehbooba Mufti say Modi Government make Jammu Kashmir prison to loot resources