Pune crime| म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरण ; मुख्य सूत्रधार डॉ. प्रीतीश देशमुखच्या घराची पोलिसांनी घेतली झडती

| Updated on: Dec 14, 2021 | 3:56 PM

जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीनेही यापूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा, टीईटी , शिष्यवृत्ती , एनटीएस एनएमएमएस यासारख्या परीक्षांमध्ये गोंधळ घातल्याने कंपनीवर दंडात्मक कारवाई करत तिला काळ्या यादीत टाकण्यात आले होते. त्यावेळी ९० लाख व २५ लाख असा दंडही ठोठवण्यात आला होता.

Pune crime| म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरण ; मुख्य सूत्रधार डॉ. प्रीतीश देशमुखच्या घराची पोलिसांनी घेतली झडती
मुंबईत म्हाडाची 4 हजार घरांची सोडत निघणार
Follow us on

पुणे – म्हाडा परीक्षा भारतातील पपेपर फुटीतील महत्त्वाचा सूत्रधार असलेला जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख यांच्या घरांची पोलिसांनी झाडा झडती घेतली आहे. यावेळी त्यांच्याकडून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. म्हाडाच्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रयत्नात असतानाच पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळं ही मोठी नामुष्की टाळली आहे. मात्र यामुळे म्हाडाला मात्र उमेदवारांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

‘म्हाडा’च्या भरती प्रक्रियेतील प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम सोपविण्यात आले होते. त्यानेच प्रश्नपत्रिका फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. प्रश्नपत्रिक फुटीत सूत्रधार असलेल्या जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीसचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख यांच्यावर गोपनीयतेचा भंग, फसवणुक केल्याचे समोर आल्याने  त्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. देशमुख हा पिंपरी चिंचवडमधील खराळवाडी परिसरात वास्तव्यास आहे.

वेगवेगळ्या घटकांच्या परीक्षाचे काम

‘म्हाडा’ चा नव्हे तर आरोग्यभरती पेपर ,पोलीस विभागातील वेगवेगळ्या घटकांच्या परीक्षांसाठी या जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला नेमण्यात आले होते. नवी मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद ग्रामीण, पुणे शहर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, नागपूर, वर्धा, भंडारा, औरंगाबाद शहर, औरंगाबाद कारागृह, सोलापूर आयुक्ता सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अश्या वेगवेगळ्या घटकांच्या परीक्षाचे काम हीच कंपनी पाहत होती.

यापूर्वी झाली आहे कारवाई

जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीनेही यापूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा, टीईटी , शिष्यवृत्ती , एनटीएस एनएमएमएस यासारख्या परीक्षांमध्ये गोंधळ घातल्याने कंपनीवर दंडात्मक कारवाई करत तिला काळ्या यादीत टाकण्यात आले होते. त्यावेळी ९० लाख व २५ लाख असा दंडही ठोठवण्यात आला होता. मात्र पुन्हा ४ मार्च २०२१ रोजी याच कंपनीचा समावेश सरळसेवा भरती प्रकियेच्या आदित्य टाकण्यात आले होते.

पंतप्रधान पीक विमा योजना : शेतकऱ्यांना 100 रुपयांच्या प्रीमियमवर किती मिळते नुकसानभरपाई?

Nashik | वाढदिवस असलेल्या मित्राला मिठी मारल्यामुळे दोन आरोपींचा तरुणावर हल्ला

St worker strike : एसटी कर्मचाऱ्यांना कारवाई आणखी कडक करण्याचा इशारा, विलीनीकरणावर परब म्हणतात…