AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एमआयएम नगरसेवकाकडून मारहाण, पालिका कर्मचाऱ्यांचं कामबंद

जालन्यातील एमआयएम नगरसेवक अबुल हसन हाश्मी यांनी केलेल्या मारहाणीनंतर पालिका कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन सुरु करण्यात आलं.

एमआयएम नगरसेवकाकडून मारहाण, पालिका कर्मचाऱ्यांचं कामबंद
Follow us
| Updated on: Nov 14, 2019 | 12:41 PM

जालना : एमआयएम नगरसेवकाने जालन्यात कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. एमआयएम नगरसेवक अबुल हसन हाश्मी यांनी केलेल्या मारहाणीनंतर (MIM Corporator beats Cleaning worker) मनपा कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन सुरु करण्यात आलं आहे.

महापालिकेसाठी पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीचे कर्मचारी कचरा संकलन करतात. छोट्या गाडीत जमा झालेला कचरा मोठ्या गाडीत भरण्याचं काम आमखास मैदानाजवळ केलं जात असताना अचानक एमआयएमचे स्वीकृत नगरसेवक तिथे आले. इथे कचरा टाकू नका असं सांगत त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली. वादाचं पर्यवसान मारहाणीत झाल्याचा आरोप केला जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच रेड्डी कंपनीचे झोनल अधिकारी इरफान आणि युनूस घटनास्थळी पोहचले. नगरसेवक हाश्मी यांनी त्यांनाही शिवीगाळ केली आणि रिक्षाला लाथा मारल्या, असा आरोप (MIM Corporator beats Cleaning worker) होत आहे.

आमदारांसाठी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय, पोलिस मात्र रस्त्यावरच

या घटनेनंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु केलं. बुधवारी दुपारनंतर कचऱ्याची एकही गाडी कामावर आली नाही. त्याचा परिणाम गुरुवारी दिसून आला. सकाळपासून कचरा संकलन करणाऱ्या सर्व गाड्या आपल्या जागेत उभ्या आहेत.

व्यावसायिक भागात कचरा संकलनाचं काम करण्यात येतं, ते काम बंद होतं. मारहाण करणार्‍या नगरसेवकांविरोधात कंपनीने तक्रार करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

याआधी एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनीही रेड्डी कंपनीच्या कचऱ्याच्या गाडीची काच फोडली होती. त्यामुळे एमआयएमला रेड्डी कंपनी करत असलेलं काम बंद करायचं आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.