AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Jihad | भाजपचे मुख्तार नक्वी आणि शहनवाज हुसैन यांचंही दुसऱ्या धर्मातील मुलींशी लग्न, कारवाई करा : MIM

भाजपमध्ये सर्वप्रथम नक्वी आणि हुसैन यांनी लव्ह जिहादची सुरुवात केल्याची टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

Love Jihad | भाजपचे मुख्तार नक्वी आणि शहनवाज हुसैन यांचंही दुसऱ्या धर्मातील मुलींशी लग्न, कारवाई करा : MIM
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 1:35 PM

औरंगाबाद : ‘लव्ह जिहाद’ची (Love Jihad) सुरुवात करणारे भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) आणि सय्यद शहनवाज हुसैन (Syed Shahnawaz Hussain) यांच्यावर आधी पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकार धर्मांतरविरोधी म्हणजेच लव्ह जिहाद कायदा आणण्याच्या तयारीत आहे. (MIM MP Imtiaz Jaleel demands action against Mukhtar Abbas Naqvi and Syed Shahnawaz Hussain)

“भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री सय्यद शहनवाज हुसैन यांनीही दुसऱ्या धर्मातील महिलांशी लग्न केलं आहे. लव्ह जिहाद कायद्यानुसार त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. कारण भाजपमध्ये सर्वात प्रथम त्यांनी लव्ह जिहादची सुरुवात केली आहे” अशी घणाघाती टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

कशी जुळली प्रेम कहाणी?

मुख्तार अब्बास नक्वी यांनी 3 जून 1983 रोजी सीमा यांच्याशी विवाह केला. 1982 मध्ये दोघं अलाहाबाद विद्यापीठात शिकत होते. शिक्षण सुरु असतानाच दोघं प्रेमात पडले. सुरुवातीला सीमा यांच्या कुटुंबीयांचा लग्नाला विरोध होता. मात्र अखेर त्यांच्या प्रेमाला कुटुंबीयांनी मान्यता दिली. निकाह आणि सात फेरे अशा दोन्ही पद्धतीने त्यांचा विवाह झाला.

शहनवाज हुसैन यांनी 12 डिसेंबर 1994 रोजी रेणू शर्मा यांच्याशी विवाहगाठ बांधली. शहनवाज यांना शिक्षणादरम्यान दिल्लीतील बसने प्रवास करताना एक तरुणी पसंतीस पडली. हळूहळू दोघांची मैत्री आणि प्रेम जडलं. परधर्मामुळे रेणू यांचा लग्नाला होकार नव्हता. मात्र अखेर शहनवाज हुसैन यांच्यासोबत आणाभाका घेण्यास रेणू शर्मा यांनी सहमती दिली. (MIM MP Imtiaz Jaleel demands action against Mukhtar Abbas Naqvi and Syed Shahnawaz Hussain)

लव्ह जिहाद कायद्याची तयारी

उत्तर प्रदेश सरकारने लव जिहादविरोधात अध्यादेश जारी केला आहे. ‘बेकायदेशीर धर्मांतर अध्यादेश 2020’ असं याचं नाव आहे. योगी सरकारच्या कॅबिनेटने 24 नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत लव जिहादसह 21 प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. या नव्या कायद्यात लव जिहाद प्रकरणातील पीडितेला आर्थिक मदत आणि दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. आंतरधर्मीय विवाहाबाबत हा कायदा आहे.

उत्तर प्रदेश सरकारच्या या कायद्यानुसार आता आंतरधर्मीय विवाहासाठी 2 महिन्यांची नोटीस द्यावी लागणार आहे. तसेच जिल्हा दंडाधिकाऱ्यांची परवानगी देखील घ्यावी लागणार आहे. जर कोणत्याही तरुणाने आपलं नाव लपवून लग्न केलं तर त्याला 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Love Jihad | जोडीदार निवडताना धर्म-लिंगाचे निर्बंध नाहीत, हायकोर्टाचा योगी सरकारला झटका

‘तरुणांचं बेरोजगारीवरुन लक्ष हटवण्यासाठी भाजपचं नाटक’, लव जिहादच्या मुद्द्यावर असदुद्दीन ओवेसी यांचं प्रत्युत्तर

(MIM MP Imtiaz Jaleel demands action against Mukhtar Abbas Naqvi and Syed Shahnawaz Hussain)

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.