Hasan Mushrif | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सेल्फ क्वारंटाईन, आठवड्यातील सर्व कार्यक्रम रद्द

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सेल्फ क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे (Minister Hasan Mushrif decide to self quarantine).

Hasan Mushrif | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सेल्फ क्वारंटाईन, आठवड्यातील सर्व कार्यक्रम रद्द
Follow us
| Updated on: Jul 15, 2020 | 10:23 PM

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सेल्फ क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे (Minister Hasan Mushrif decide to self quarantine). त्यांच्या जवळील एका सहकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, मुश्रीफ यांनी या आठवड्यातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. याशिवाय कुणीही भेटायला येऊ नये, असं आवाहन मुश्रीफ यांनी केलं आहे (Minister Hasan Mushrif decide to self quarantine).

हेही वाचा : दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांना ‘कोरोना’ची लागण

कोरोना संकट काळातही मुश्रीफ गावोगाव फिरुन लोकांची विचारपूस करत आहेत. ते नेहमी लोकांच्या गराड्यात असतात. मुश्रीफ आज (15 जुलै) मुंबईत आहेत, उद्या सकाळी अहमदनगरमध्ये बैठक घेऊन संध्याकाळपर्यंत कोल्हापुरात दाखल होणार आहेत. ते ग्राम विकास खात्याशी संबंधित विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतात. या आठवड्यातही जिल्हा परिषद सदस्यांना टॅबचे वाटप आणि इतर कार्यक्रम नियोजित होते. मात्र, आता आठवड्याभराचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

राज्यातील मंत्री, आमदारांना कोरोनाची लागण

राज्यात यापूर्वी काही मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

हेही पहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

नाशिकमधील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांना कोरोनाची लागण झाली होती. तर नांदेडच्याही एका आमदाराला कोरोना झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या विद्यमान आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे.

पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. तर भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर, मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाली. दरम्यान, मोहोळ यांच्यात कोरोनाची लक्षणे नसल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते सध्या होम क्वारंटाईन आहेत.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.