सुधीर मुनगंटीवारांकडे नवी जबाबदारी, विधीमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी निुयक्ती
या नव्या पदासाठी सर्व स्तरातून मुनगंटीवार यांचं अभिनंदन केलं जात आहे.
चंद्रपूर : महाराष्ट्र विधीमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Former Finance Minister Sudhir Mungantiwar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत या लोकलेखा समितीच्या सदस्यपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा माजी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी शालेय शिक्षण मंत्री अॅड. आशिष शेलार, माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री विनय कोरे, माजी राज्यमंत्री संजय सावकारे आदींचा समावेश असणार आहे. (Minister Sudhir Mungantiwar appointed as Chairman of the Public Accounts Committee of the Maharashtra Legislature)
लोकलेखा समिती ही महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त समिती आहे. यामध्ये राज्याचे विनियोजन लेखे आणि नियंत्रक तसंच महालेखापरीक्षक यांचा अहवाल, त्याचं परिनिरीक्षण करणं, राज्य शासनाच्या वित्तीय लेख्यांचं आणि त्यावरील लेखापरीक्षा अहवालाचं परिनिरीक्षण करणं अशी कामं येतात.
इतकंच नाही तर यामध्ये राज्याची महामंडळं, व्यापार विषयक व उत्पादन विषयक योजना, प्रकल्प यांचं उत्पन्न आणि खर्च दाखवणारा लेखा विवरणं तसंच एखादे विशिष्ट महामंडळ, व्यापारी संस्था किंवा प्रकल्प यांना भांडवल पुरवण्यासंदर्भात नियमन करणाऱ्या वैधानिक नियमांच्या तरतूदी अन्वये तयार केलेला करणं. यामध्ये ताळेबंद व नफा तोट्याच्या लेख्यांची विवरणं, त्यावरील नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांचा अहवाल तपासणं, राज्यपालांनी कोणत्याही जमा रकमांची लेखा परिक्षा करण्याबाबत किंवा साठा व मालासंबंधीचे लेखे तपासण्याबाबत नियंत्रक व महालेखापरिक्षक यांना निर्देशीत असेल त्याबाबतीत त्यांच्या अहवालाचा परिक्षण करणं ही लोकलेखा समितीची प्रमुख कर्तव्ये आहेत.
यामुळे आता मुनगंटीवार यांच्यावर अनेक नव्या जबाबदाऱ्या असणार आहेत. या नव्या पदासाठी सर्व स्तरातून मुनगंटीवार यांचं अभिनंदन केलं जात आहे.
खरंतर, गेल्या काही दिवसांआधी सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या कुटुंबातीलही काहीजण कोरोना पॉझिटिव्ह होते. पण आता त्यांची तब्येत ठीक असून कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर मात करत त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
इतर बातम्या –
‘फडणवीस सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला, कागदोपत्री सिद्ध करुन दाखवणार’- सचिन सावंत
VIDEO : Ashish Shelar | लपूनछपून मुलाखती देण्याऐवजी थेट चर्चेला या, आशिष शेलारांचं अदित्य ठाकरेंना आव्हानhttps://t.co/jqaHTttn1q
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
(Minister Sudhir Mungantiwar appointed as Chairman of the Public Accounts Committee of the Maharashtra Legislature)