छेडछाडीला कंटाळून पंढरपुरात अल्पवयीन मुलीची आत्महत्या
कॉलेजमधील मुलांनी केलेल्या छेडछाडीला कंटाळून एका कॉलेज तरूणीने आत्महत्या केली.
पंढरपूर : कॉलेजमधील मुलांनी केलेल्या छेडछाडीला कंटाळून एका कॉलेज तरूणीने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यातील शेळवे गावात घडली. स्वप्नाली सत्यवान गाजरे (वय 17) असं या अल्पवयीन विद्यार्थीनीचं नाव आहे. (minor girl commits suicide in Pandharpur)
स्वप्नाली ही घरापासून जवळ असलेल्या वाडीकुरोलीमधल्या कॉलेजमध्ये 11 च्या वर्गात शिकत होती. ती सायकलवरून शाळेत दररोज ये जा करायची. गावातील तीन तरुण तिची छेडछाड करुन तिला सतत अपमानित करत होते. त्यांच्या या छेडछाडीला कंटाळून तिने 6 डिसेंबर रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
स्वप्नालीचे वडील सत्यवान गाजरे यांनी तिची शाळेची बॅग तपासली असता वहीमध्ये एक चिठ्ठी सापडली. चिठ्ठीमध्ये “आई बापू मला माफ करा, आत्महत्या करणं गुन्हा असला तरी मला आता सहन होत नाही. हाती तिरंगा आणि आर्मीचा गणवेश माझ्या नशिबी नाही. रमेश गाजरे, लहू टेलर आणि स्वप्नील कौलगे यांनी माझ्या स्वप्नांचा पार धुराळा केलाय. माझी सतत छेड काढून मला जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली. त्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे”, असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी तिच्या बॅगमध्ये आढळून आली.
स्वप्नालीच्या बॅगमध्ये मिळालेल्या चिठ्ठीनंतर या संशयित आरोपींविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे. या घटनेनंतर पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
चिठ्ठीत स्वप्नाली म्हणते…
“किती सहन करु मी… मला आता अजिबात होत नाही. तिरंगा आणि आर्मीचा गणवेश माझ्या नशिबात नाही. कारण रमेश गाजरे, लहू टेलर आणि स्वप्नील कौलगे यांनी माझ्या स्वप्नांचा पार धुराळा केलाय. माझी सतत छेड काढून मला जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली. त्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे…”
(minor girl commits suicide in Pandharpur)
संबंधित बातम्या
शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून वारंवार छेडछाड; वैतागलेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या