एकाच कुटुंबाचा शासकीय लॅबचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, खासगी लॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह, ठाणे महापालिकेविरोधात मनसे आक्रमक

ठाण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच महापालिकेच्या मान्यताप्राप्त लॅब्सचा भोंगळपणा मनसेने चव्हाट्यावर आणला आहे (MNS aggressive against TMC COVID 19 testing labs work).

एकाच कुटुंबाचा शासकीय लॅबचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह, खासगी लॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह, ठाणे महापालिकेविरोधात मनसे आक्रमक
Follow us
| Updated on: Jul 10, 2020 | 1:26 AM

ठाणे : ठाण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच महापालिकेच्या मान्यताप्राप्त लॅब्सचा भोंगळपणा मनसेने चव्हाट्यावर आणला आहे (MNS aggressive against TMC COVID 19 testing labs work). मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ठाणे महापालिकेच्या मान्यताप्राप्त असलेल्या दोन लॅब्सने एका कुटुंबाला कोरोनाचे परस्पर विरोधी रिपोर्ट देऊन संभ्रमात पाडल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली. याशिवाय आणखी एका महिलेसोबत तसंच घडल्याचं त्यांनी सांगितलं (MNS aggressive against TMC COVID 19 testing labs work).

ठाण्यातील एका कुटुंबाने महापालिकेच्या कळवा येथील शासकीय लॅबमध्ये कोरोना चाचणी केली. त्या लॅबने त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह दिला. त्यानंतर कुंटुंबियांनी महापालिकेची मान्यता असलेल्या खासगी लॅबमध्ये चाचणी केली. तिथे त्यांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला. त्यामुळे कोणत्या लॅबचा रिपोर्ट गृहित धरावा, असा प्रश्न कुंटुंबियांना पडल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

या भोंगळ कारभारामुळे अविनाश जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह थेट महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना घेरले. यावेळी त्यांनी आयुक्तांना लॅब्सच्या भोंगळ कारभाराबाबत माहिती दिली. “कोरोनाचा विळखा ठाणे शहराला घट्ट आवळत असताना पालिकेच्या भोंगळ कारभाराने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. महापौर नरेश म्हस्के आणि ठाण्यातील सर्व नेते गायब झाल्याने आज ठाणेकरांनी जाब कोणाला विचारायचा”, असा सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केला.

दरम्यान, “ठाणे महानगरपालिकेने लवकरच आपल्या कारभारात सुधारणा करावी. नागरिकांना या कठीण समयी मदतीचा हात द्यावा, अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही”, असा धमकीवजा इशारा जाधव यांनी दिला आहे. तर दुसरीकडे महापालिका आयुक्तांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.

हेही वाचा : Maharashtra Corona Update | नऊ दिवसात 34,105 रुग्णांना डिस्चार्ज, बाधितांचा आकडा 2 लाख 30 हजार 599 वर

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.