गदिमांच्या स्मारकाची ही परिस्थिती असेल तर तुम्हाला तुमचं सरकार लखलाभ, अविनाश जाधव आक्रमक

गदिमांची ही परिस्थिती असेल तर तुम्हाला तुमचं सरकार लखलाभ," असा टोलाही अविनाथ जाधव यांनी लगावला आहे.  (MNS Criticism on Sangli Ga.Di. Madgulkar Monument misery) 

गदिमांच्या स्मारकाची ही परिस्थिती असेल तर तुम्हाला तुमचं सरकार लखलाभ, अविनाश जाधव आक्रमक
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 12:22 PM

सांगली : महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी अशी ओळख असलेले गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर यांच्या सांगलीतील स्मारकाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. सांगलीतील शेतफळ नावाच्या गावात ग. दि. माडगूळकरांचे 2008 ते 2009 मध्ये  स्मारक उभारले होते. या स्मारकातील खुर्च्या, दार, खिडक्या धूळखात पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी महाविकासआघाडीवर आरोप केले आहेत.  यावर सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत पोलखोल केली आहे. (MNS Criticism on Sangli Ga.Di. Madgulkar Monument misery)

“राज्य सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करुन ही वास्तू बनवलेली असेल, तर हे राजकीय नेते करतात काय? असा सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे. तसेच गदिमांची ही परिस्थिती असेल तर तुम्हाला तुमचं सरकार लखलाभ,” असा टोलाही अविनाथ जाधव यांनी लगावला आहे.

अविनाश जाधव नेमकं काय म्हणाले?

नमस्कार मी अविनाश जाधव, मी सध्या सांगलीच्या दौऱ्यावर आहे. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. तिथून काही अंतरावर शेतफळे नावाचे गाव आहे. त्या ठिकाणी ग. दि. माडगूळकरांचा जन्म झाला. त्या जन्मभूमीत मी उभा आहे. त्या ठिकाणी माडगूळकरांचं 2008 मध्ये एक स्मारक उभारले. त्यावेळी निवडणुकीत घाईघाईत हे स्मारक उभं केलं. त्याचं उद्धाटन केले.

2008-09 मध्ये हे स्मारक उभं राहिल्याने याकडे कोणीही दोष देऊ शकत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना देखीलही आमच्यावेळेचं नाही, असं बोलू शकत नाही, अशी टीका अविनाश जाधव यांनी केली आहे.

कारण ते दोघे आता सत्तेत आहेत. आपले राजकीय नेते मतांसाठी किती लोचट आहेत, त्याचं एक उदाहरण गदिमांचं स्मारक कसं पडलं आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे. या गदिमांच्या स्मारकात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासिका उभी करण्यात येणार होती. मात्र या ठिकाणी काही उभं केलं नाही. सरकारने हे ना कोणत्या ग्रामस्थांच्या ताब्यात दिलं ना या ठिकाणी कोणी प्रशासकीय अधिकारी नेमला आहे. उद्धाटन करायचं म्हणून करायचं म्हणून ही वास्तू उभी केली, असा आरोपही अविनाश जाधव यांनी केला आहे.

गदिमांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. गदिमांचा फोटोही मनसेने दिलेला आहे. अशा अत्यंत वाईट स्थितीत करोडो रुपये खर्च करुन ही वास्तू बनवलेली असेल, तर राज्यात हे राजकीय नेते करतात काय? गदिमांची ही परिस्थिती असेल तर तुम्हाला तुमचं सरकार लखलाभ, असा टोला अविनाश जाधव यांनी महाविकासआघाडी सरकारला लगावला आहे. (MNS Criticism on Sangli Ga.Di. Madgulkar Monument misery)

संबंधित बातम्या : 

सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत, याद राखा! कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल

कोचिंग क्लास पुन्हा सुरु करा, कोचिंग क्लासेसचं शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.