कल्याण-डोबिंवली कोरोनाचा हॉटस्पॉट, यंत्रणा अपुरी पडते, धारावीत पाहणी केली, कल्याण-डोंबिवलीतही करा, मनसेचं आरोग्यमंत्र्यांना आवाहन
कल्याण-डोबिंवली कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी धारावीप्रमाणे कल्याण-डोंबिवलीचीदेखील पाहणी करावी", अशी मागणी कल्याण-डोंबिवली ग्रामीण मतदारसंघाचे मनसेचे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil on Corona) यांनी केली.
ठाणे : “कल्याण-डोबिंवली कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे (MNS MLA Raju Patil on Corona). कोरोनाबाधितांचा माग काढण्यात यंत्रणा अपुरी पडत आहे. इथे टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रिटमेंट, ट्रॅकिंग हा फॉर्म्युला औषधाला सापडत नाही. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी धारावीप्रमाणे कल्याण-डोंबिवलीचीदेखील पाहणी करावी”, अशी मागणी कल्याण-डोंबिवली ग्रामीण मतदारसंघाचे मनसेचे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil on Corona) यांनी ट्विटरवर केली आहे.
कल्याण डोंबिवली #COVID19 चा #Hotspot बनला आहे. इथे testing, tracing, treatment, tracking,हा फार्मुला औषधाला पण सापडत नाहीये. #COVID19 बाधितांचा माग काढण्यात यंत्रणा अपूरी पडत आहे.धारावीची केली तशी #KDMC ची पाहणी करणे गरजेचे आहे. @rajeshtope11 @CMOMaharashtra @KDMCOfficial
— Raju Patil (@rajupatilmanase) April 10, 2020
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. शहरात आज आणखी 6 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 49 वर पोहोचली आहे. यामध्ये 25 डोंबिवली पूर्व, 7 डोंबिवली पश्चिम, 9 कल्याण पूर्व, 7 कल्याण पश्चिम तर टिटवाळ्याचा 1 रुग्ण आहे. यापैकी 8 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून दोघांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीकडून बऱ्याच उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील किराणा माल आणि इतर जीवनाश्यक दुकाने सकाळी 5 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याचबरोबर तापाच्या रुग्णालयांचेदेखील वर्गीकरण करण्यात आलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी डोंबिवलीत 28 बेडचे खाजगी रुग्णालयदेखील सुरु करण्यात आलं आहे.
एकीकडे महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी भाजी मार्केटमध्ये तुफान गर्दी बघायला मिळत आहे. याशिवाय शास्त्रीनगर रुग्णालयात अस्वच्छता असून डॉक्टर वेळेवर येत नाही, असा आरोप एका क्वारंटाईन असणाऱ्या तरुणाने केला आहे.
संबंधित बातम्या :
केडीएमसी महापौरांची नर्स म्हणून काम करण्याची इच्छा, आयुक्तांकडे पत्रामार्फत मागणी
भवानी पेठ परिसरात सर्वाधिक, पुण्यात कोणत्या वॉर्डमध्ये किती कोरोनाग्रस्त?
देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या मुंबईची स्थिती काय? प्रत्येक हॉटस्पॉटची संपूर्ण माहिती