कुठे आहेत ते मुल्ला-मौलवी, राज ठाकरेंचा सवाल

दिल्लीत निजामुद्दीनच्या मरकज येथील कार्यक्रमावर राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी सडकून टीका केली.

कुठे आहेत ते मुल्ला-मौलवी, राज ठाकरेंचा सवाल
Follow us
| Updated on: Apr 04, 2020 | 12:20 PM

मुंबई :निवडणुकीच्या वेळी कुणाला मतदान करायचं? हे सांगत फिरणारे मुल्ला-मौलवी आता कुठे गेले? आता यावेळी त्यांना लोकांना घरात बसा असं सांगता येत नाही? या लोकांना आतूनच पाठिंबा असतो. संशय निर्माण करणारी परिस्थिती आज मुस्लीम समाज निर्माण करतोय. मग उद्या जर सरकारने किंवा कुठल्या पक्षाने भूमिका घेतली नंतर या लोकांनी दोष द्यायचा नाही”, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी केला.

दिल्लीत निजामुद्दीनच्या मरकज येथील कार्यक्रमावर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली. देशात कोरोनाचं संकट असताना अशाप्रकारे कार्यक्रम करणं योग्य नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन देशातील घडामोडींवर भाष्य केलं.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“मी अमेरिकेची एक गंभीर बातमी वाचली. त्यांच्याकडे बंदूका दुकानात मिळतात. गेल्या काही दिवसात 30 ते 32 लाख लोकांनी बंदूका विकत घेतल्या. उद्या समाजा कोरोना वाढला, लोकं रस्त्यावर आले आणि लुटालूट सुरु झाली तर स्वसंरक्षणासाठी त्यांनी बंदूका घेतल्या. भारतामध्ये ही परिस्थिती नाही. मात्र आज अनेक ठिकाणी दिसतंय, लोक पोलिसांना शिव्या देतात. तुम्ही पोलिसांवर हात टाकता?”, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

“दिल्लीला मरकजचा प्रकार घडला. अशा लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत. त्यांच्यावर कसला उपचार करताय? त्यांचा कुठलातरी वेगळा स्वतंत्र विभाग करावा आणि त्यांच्यावरील सर्व उपचार बंद करावे. त्यांना याही दिवसांमध्ये धर्म मोठा वाटत असेल आणि काही कारस्थान करायचं असेल तर त्यांना फोडून काढायला हवं”, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

“नोटांना आणि भाज्यांना थूंकी लावणं, नर्सेससमोर नग्न फिरणं, लोकांच्या अंगावर थुकणं असेप्रकार हे करत आहेत. या लोकांना फोडून काढण्याचे व्हिडीओ बाहेर निघायला पाहिजेत तर लोकांना काहीतरी विश्वास बसेल. याबद्दल पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे”, असं राज ठाकरे म्हणाले.

मुसलमानांमधील काही औलादी आहेत जे काही असे कृत्य करत आहेत अशांना ठेचलं पाहिजे. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी लॉकडाऊन देशात काही दिवसांसाठीच आहे, नंतर आम्ही आहोतच, असा इशार राज ठाकरे यांनी दिला.

लोकं अशाप्रकारे एकत्र आले आणि कोरोना वाढत राहिला तर लॉकडाऊन वाढतच राहणार. आज सामाजाची सर्वात मोठी जबाबदारी आहे. नुसतं सुशिक्षित असून चालत नाही सुज्ञही असावं लागतं. ही वेळ सरकारवर आरोप करण्याची नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

आपण शिस्त पाळली नाही तर मोठं आर्थिक संकट येईल. पंतप्रधान आले तेव्हा ते काहीतरी बोलतील असं वाटलं होतं. जे लॉकडाऊन पाळत आहेत त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. राशन मिळणार का? कालांतराने नोकरी राहील का? बॉर्डर सील केल्यात तर मग भाजीपालाचे ट्रक येतील का? जे शिस्त पाळत नाहीत त्यांच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. बातम्या येतात तेव्हा वाटतं अरे असं कसं हे घडू शकतं.

पंतप्रधानांनी सागितलंय की, 9 वाजता दिवे लावायचे, मेणबत्ता पेटवायचे. पेटवतील लोकं. नाहीतरी घरात बसून करतील काय? हा श्रद्धेचा किंवा अंधश्रद्धेचा विषय असेल त्याच्याने परिणाम होत असेल तर कोरोनावर त्याने परिणाम होवो. परंतु, नुसतं दिवे घालवून, मेणबत्या पेटवून, टॉर्च लावून यापेक्षा मला असं वाटतं पंतप्रधानांच्या भाषणामध्ये एक आशेचा किरण जरी असता तरी लोकांना समाधान वाटलं असतं, असं राज ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या :

भाज्यांना थुंकी लावणारे, नर्ससमोर नग्न फिरणाऱ्यांना फोडून काढा आणि व्हिडीओ व्हायरल करा : राज ठाकरे

उपचार काय करताय, मरकजवाल्यांना गोळ्या घाला : राज ठाकरे

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.