AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात दुसरा मोबाईल पडून आहे? विद्यार्थ्यांसाठी दान करा, पुणे झेडपीचा भन्नाट उपक्रम

जुना अँड्रॉइड मोबाईल, टीव्ही, टॅब आणि कम्प्युटर विद्यार्थ्यांसाठी दान देण्याचं आवाहन केलं आहे. (Mobile and Digital Equipment's donation program)

घरात दुसरा मोबाईल पडून आहे? विद्यार्थ्यांसाठी दान करा, पुणे झेडपीचा भन्नाट उपक्रम
Follow us
| Updated on: Jul 06, 2020 | 12:20 PM

पुणे : पुणे जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अँड्रॉईड मोबाईल दान देण्याचं आवाहन केलं आहे. जुना अँड्रॉइड मोबाईल, टीव्ही, टॅब आणि कम्प्युटर देण्याचं आवाहन केलं आहे. 15 जुलैपासून पुण्यातील झेडपीच्या शाळांत ऑनलाईन शिक्षण सुरु होणार आहे. (Mobile and Digital Equipment’s donation program)

झेडपीच्या शाळेत दोन लाख 32 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र एक लाख 32 हजार कुटुंबियांकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध आहेत. तर एक लाख विद्यार्थ्यांकडे कोणत्याही प्रकारची ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे हा उपक्रम राबवण्यात आला आहे. झेडपीचे सीईओ आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

त्याचबरोबर जिल्ह्यातील नेटवर्क नसलेल्या दुर्गम भागात वायफाय सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. नेटवर्क नसलेल्या 35 ग्रामपंचायत परिसरात जवळपास हजार विद्यार्थी आहेत. भोर वेल्हा, आंबेगाव आणि जुन्नर या चार तालुक्यात दुर्गम भागात नेटवर्कची अडचण आहे. त्यामुळे अशा ठिकाणी भारत नेट डिपार्टमेंट ऑफ आयटी मार्फत इंटरनेट उपलब्ध करून दिला जाणार आहे. वाय-फाय राऊटर माध्यमातून गावात विद्यार्थ्यांना वाय-फाय दिले जाणार आहे.

(Mobile and Digital Equipment’s donation program)

विद्यार्थ्यांच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये डेव्हलप केलेले ॲप डाऊनलोड करता येईल. डिजीटल टेक्स्टबुक विकसित केलं आहे. त्यामुळं कोणताही विद्यार्थी मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकून प्रोफाईल तयार करू शकतो. एका वर्षाचा अभ्यासक्रम तीस आठवड्यात विभागून विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.

सुप्रिया सुळे यांचं आवाहन

दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करुन या उपक्रमाला प्रतिसाद देण्याचं आवाहन केलं आहे. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक उपकरणाअभावी शिक्षण घेणे अवघड होत आहे, त्यामुळे दानशूरांनी सुस्थितीतील उपकरणे दान करावी, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या 

Online Schools | राज्यात ऑनलाईन शाळांना आजपासून सुरुवात | पुणे, नागपुरात ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात   

नववी ते बारावीसाठी 3 तास, ऑनलाईन शिक्षणाबाबत शिक्षण विभागाकडून प्रस्ताव तयार, मुख्यमंत्र्यांकडून अद्याप शिक्कामोर्तब नाही

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.