AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सात दिवस, 64 विमानांची उड्डाणे, तेरा देशांत अडकलेले 14 हजार 800 भारतीय मायदेशी परतणार

यूएई, यूके, यूएसए, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, मलेशिया, फिलिपिन्स, बांगलादेश, बहारेन, कुवैत आणि ओमान या तेरा देशांमधून भारतीयांना मायदेशी परत आणले जाईल (14,800 Indian nationals stranded abroad to return by 64 flights in seven days)

सात दिवस, 64 विमानांची उड्डाणे, तेरा देशांत अडकलेले 14 हजार 800 भारतीय मायदेशी परतणार
Follow us
| Updated on: May 05, 2020 | 3:24 PM

नवी दिल्ली : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 13 विविध देशांमध्ये अडकलेल्या सुमारे 14 हजार 800 भारतीय नागरिकांना परत आणण्याच्या हालचाली मोदी सरकारने सुरु केल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात या नागरिकांना परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने आराखडा तयार केला आहे. 7 ते 13 मे या आठवड्याभराच्या कालावधीत 64 विमानांनी टप्प्याटप्प्यात जवळपास 15 हजार भारतीय मायदेशी परत येतील. (14,800 Indian nationals stranded abroad to return by 64 flights in seven days)

पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवार 7 मे रोजी दहा विमानांच्या उड्डाणांनी 2300 भारतीय परतणार आहेत. दुसर्‍या दिवशी नऊ देशांतील 2050 भारतीय नागरिक चेन्नई, कोची, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरु आणि दिल्लीला परत जातील. तिसर्‍या दिवशी 13 देशांतील अंदाजे 2050 भारतीय चेन्नई, कोची, मुंबई, लखनौ आणि दिल्लीला परततील. चौथ्या दिवशी अमेरिका, यूएई आणि लंडनहून 1850 भारतीयांना परत आणण्याची योजना आहे.

एअर इंडियाची उड्डाणे होणार

एअर इंडिया आणि त्यांचे सहाय्यक ‘एअर इंडिया एक्सप्रेस’मार्फत ही विशेष उड्डाणे केली जातील. यूएई, यूके, यूएसए, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, मलेशिया, फिलिपिन्स, बांगलादेश, बहारेन, कुवैत आणि ओमान या तेरा देशांमधून भारतीयांना मायदेशी परत आणले जाईल.

7 ते 13 मे दरम्यान भारतातून यूएईसाठी 10, यूएस आणि ब्रिटनसाठी प्रत्येकी सात, सौदी अरेबिया आणि सिंगापूरला प्रत्येकी पाच, तर कतारसाठी दोन विमानांचं उड्डाण होईल.

हेही वाचा : स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार, सोनिया गांधींची घोषणा

बांगलादेश आणि मलेशियाला प्रत्येकी सात, तर कुवैत आणि फिलीपिन्सला प्रत्येकी पाच उड्डाणे होतील. या व्यतिरिक्त ओमान आणि बहारेनसाठी प्रत्येकी दोन उड्डाणे होणार आहेत.

64 उड्डाणांपैकी केरळमधून 15, दिल्ली आणि तामिळनाडूहून प्रत्येकी 11, महाराष्ट्र आणि तेलंगणा येथून प्रत्येकी सात, तर उर्वरित उड्डाणे पाच इतर राज्यांमधून होतील. अमेरिकेत मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी आणि पर्यटक अडकले असल्याने येत्या आठवड्यात विमानांची संख्या वाढवली जाऊ शकते.

(14,800 Indian nationals stranded abroad to return by 64 flights in seven days)

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.