सिडको प्रकल्पातील मालमत्तांचे लीज होल्ड ऐवजी फ्री होल्ड करावे, खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

खासदार इम्तियाज जलील यांनी सिडको प्रकल्पातील लीज होल्ड असलेल्या जमीनी फ्री होल्ड करण्याची मागणी केली आहे. येथील जमीन धारकांना त्यांच्या मालमत्तेचा विकास करण्याकरिता अनेक समस्या उद्भवत असल्याने त्यांच्या मालमत्तांचे फ्री होल्ड करण्यासाठी शासनस्तरावर तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सिडको प्रकल्पातील मालमत्तांचे लीज होल्ड ऐवजी फ्री होल्ड करावे, खासदार इम्तियाज जलील यांची मागणी
खासदार इम्तियाज जलील
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 1:48 PM

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी सिडको प्रकल्पातील लीज होल्ड असलेल्या जमीनी फ्री होल्ड करण्याची मागणी केली आहे. येथील जमीन धारकांना त्यांच्या मालमत्तेचा विकास करण्याकरिता अनेक समस्या उद्भवत असल्याने त्यांच्या मालमत्तांचे फ्री होल्ड करण्यासाठी शासनस्तरावर तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आणि औरंगाबाद सिडकोचे मुख्य प्रशासक यांना पत्राव्दारे त्यांनी ही विनंती केली.

मुख्यमंत्र्यांची मागील वर्षी घोषणा

मागील वर्षी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सिडको प्रकल्पातील मालमत्तांचे लीज होल्ड ऐवजी फ्री होल्ड करण्याची घोषणा केली होती. तसेच पालकमंत्री सुभाष देसाई यांनीसुध्दा लवकर होणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजतागायत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसून, प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबितच असून सिडकोतील रहिवासी याबाबत न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

सिडकोवासियांची अडचण काय?

औरंगाबाद शहरातील सिडको प्रकल्पातील लीज होल्ड असलेल्या जमीन धारकांना बँकेत कर्ज घेताना अडचणी येतात. टीडीआर लोड करण्यासाठी, बेस एफएसआय 1.1 झाल्यामुळे सिडको क्षेत्रातील मालमत्तांच्या बाबत 0.1 एफएसआय संदर्भात आकारण्यात येणारे प्रिमियम शुल्क कमी करणे, 20 मीटर रस्त्याखालील निवासी तसेच वाणिज्य मालमत्तांना बेसरेटच्या 75 टक्के आणि 20 मीटर रस्त्यांवरील मालमत्तांना 100 टक्के प्रिमियम आकारणी करण्यात येते. सदरील प्रिमिअम शुल्क मनपाप्रमाणे 35 टक्के असावी, अशा प्रकारच्या या सिडको प्रकल्पातील जमीनधारकांच्या अडचणी दूर होणे गरजेचे आहे. सिडको प्रकल्पातील मालमत्तांचे फ्री होल्ड झाल्यास, सिडको संचालक मंडळाच्या ठरावानुसार एकरकमी शुल्क आकारणीनंतर मालमत्ताधारकांना परत हस्तांतरण शुल्क भरावे लागणार नाही. तसेच बँक कर्जासाठी सिडकोच्या ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही, तसेच मालमत्तांच्याबाबत एफएसआय संदर्भात आकारण्यात येणारे प्रिमियम शुल्क मनपाप्रमाणे होईल. यासाठी मात्र, सिडकोच्या यापूर्वीच्या संचालक मंडळाच्या ठरावानुसार मान्यतेतील धोरणात सुधारणा करावी लागेल. तसेच टीडीआर लोड करता आल्यास हाऊसिंग स्टॉक होण्यासाठी मदत होणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

इतर बातम्या-

Nagpur ZP | नागपूर झेडपीच्या एफडी घोटाळ्यात एका कर्मचाऱ्याचे निलंबन; घोटाळा हिमनगाचे टोक, तपासाचे मोठे आव्हान, कारण…

आम्ही काँग्रेसकडे झोळी घेऊन उभे नाही, ते कधीही न जिंकलेल्या 10 जागा मागितल्या होत्या : संजय राऊत

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.