MPSC exam guidelines : प्रशासनाची जय्यत तयारी, 21 मार्चला परीक्षा, 100 मी परिसरात फोन, STD, झेरॉक्स, मोबाईल बंद

सातही परीक्षा उपकेंद्र परिसरात कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. (MPSC exam 2021 new guidelines for Maharashtra Public Service Commission exam date on 21 march)

MPSC exam guidelines : प्रशासनाची जय्यत तयारी, 21 मार्चला परीक्षा, 100 मी परिसरात फोन, STD, झेरॉक्स, मोबाईल बंद
प्रशासनाची जय्यत तयारी, 21 मार्चला परीक्षा
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 4:59 PM

वाशिम : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी राज्य पूर्व परीक्षा 2020, येत्या  रविवारी, 21 मार्च 2021 रोजी वाशिम शहरातील सात परीक्षा उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात हा परीक्षा घेण्यात येणार आहे. या सातही परीक्षा उपकेंद्र परिसरात कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. (MPSC exam 2021 new guidelines for Maharashtra Public Service Commission exam date on 21 march)

या सात पकेंद्रांवर होणार परीक्षा

महाराष्ट्र राज्य पूर्व परीक्षा वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय, हॅपी फेसेस हायस्कूल, श्री शिवाजी हायस्कूल, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, बाकलीवाल विद्यालय, एस. एम. सी. इंग्लिश स्कूल व जवाहर नवोदय विद्यालय या सात परीक्षा उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. या सर्व परीक्षा उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून परीक्षा उपकेंद्रांवर ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही.

100 मीटर परिसरात निर्बंध लागू

उपकेंद्राच्या 100 मीटर परिक्षेत्रात केंद्राधिकारी, पर्यवेक्षक, समवेक्षक, सहाय्यक कर्मचारी, परीक्षार्थी, परीक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडून नियुक्त केलेले अधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींना प्रवेशास मनाई राहील. उपकेंद्रावर 100 मीटरचे आत रस्त्यावरून वाहन नेण्यास मनाई राहील.

आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई

परीक्षा उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी., आय.एस.डी., झेरॉक्स, फॅक्स, ई-मेल, ध्वनीक्षेपक इत्यादी सुविधांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. परीक्षा उपकेंद्रावर मोबाईल फोन, वायरलेस सेट, रेडिओ, दूरदर्शन, कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटर वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. परीक्षा उपकेंद्रावर एकाच वेळी चार पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर आदेश 21 मार्च रोजी सकाळी 8 वाजेपासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहतील, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. (MPSC exam 2021 new guidelines for Maharashtra Public Service Commission exam date on 21 march)

इतर बातम्या

जबरदस्त फीचर्ससह दमदार ऑडियो क्वालिटी, Redmi TV X50, X55, X65 भारतात लाँच

Mumbai Police commissioner : अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी, हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.