‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना बनवले कोट्याधीश; 20 वर्षांमध्ये शेअर्सच्या किमतीत 650 टक्क्यांची वाढ
पेनी स्टॉकमध्ये असेल्या कंपनीचे शेअर्स विकत घेताना कंपनीच्या धोरणाचा चांगला अभ्यास केल्यास त्यातून देखील मोठा फायदा होतो. हेच आरती इंडस्ट्रीजच्या शेअर्समधून समोर आले आहे.
नवी दिल्ली – पेनी स्टॉकमध्ये पैसा गुंतवणे तसे जोखमीचे काम असते, अशा कंपन्यांच्या शेअर्समधून कधीकधी चांगला परतावा मिळतो. मात्र अशा कंपान्याचे बाजारमूल्य हेच मुळात कमी असल्याने देशांतर्गंत घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घडामोंडिचा देखील कंपनीच्या शेअर्सवर परिणाम होतो. शेअर्स कोसळण्याची भीती असते. मात्र पेनी स्टॉकमध्ये असेल्या कंपनीचे शेअर्स विकत घेताना कंपनीच्या धोरणाचा चांगला अभ्यास केल्यास त्यातून देखील मोठा फायदा होतो. हेच आरती इंडस्ट्रीजच्या शेअर्समधून समोर आले आहे. आरती इंडस्ट्रीजच्या शेअर्सधारकांना कमी पौशांमध्ये मोठा लाभ मिळाला आहे.
20 वर्षांमध्ये शेअर्सच्या किमतीत 650 टक्क्यांची वाढ
आरती इंडस्ट्रीजचे शेअर्स सातत्याने वाढत आहे. 28 नोव्हेंबर 2001 मध्ये आरती इंडस्ट्रीजच्या प्रति शेअर्सची किंमत ही 1.51 रुपये एवढी होती. तर गेल्या 8 नोव्हेंबरला ती प्रती शेअर्स 972.20 रुपयांवर बंद झाली आहे. म्हणजेच गेल्या 20 वर्षांमध्ये या कंपनीचे शेअर्स 650 टक्क्यांनी वाढले आहेत. 2001 मध्ये ज्या गुंतवणूकदारांनी आरती इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 20 हजार अथवा त्यापेक्षा अधिक रक्कम गुंतवली होती. ते गुंतवणुकदार आज कोट्याधीश झाले आहेत.
1.30 कोटी रुपयांचा परतावा
ज्या गुंतवणूकदारांनी आरती इंडस्ट्रीजमध्ये 20 वर्षांपूर्वी 20 हजारांची गुंतवणूक केली होती. त्या शेअर्सधारकांना आज तब्बल 1.30 कोटी रुपयांचा परतावा मिळाला आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना तब्बल 65 हजार टक्क्यांनी अधिक परतावा मिळावा आहे. शेअर्सची किंमत अनेक पटींनी वाढल्यामुळे 2001 ला 20 हजार रुपयांमध्ये जेवढे शेअर्स विकत घेता येत होते. तेवढे शेअर्स आता विकत घेण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. पेनी स्टॉकमध्ये असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला गुंतवणूकदार तयार नसतात, मात्र योग्य पद्धतीने गुंतवणूक केल्यास त्यातून चांगाला परतावा मिळू शकतो हेच यातून दिसून येते.
पेनी स्टॉक म्हणजे काय?
दर्शनी मूल्यापेक्षा कमी बाजारभाव असलेल्या शेअर्सना सर्वसाधारणपणे पेनी स्टॉक असे म्हटले जाते. अशा कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य 100 कोटीहून कमी असते. अमेरिकेत 5 डॉलरपेक्षा कमी बाजारभाव असलेल्या सर्व शेअर्सना पेनी स्टॉक असे संबोधले जाते. जरी अशा शेअर्समधून प्रचंड नफा होण्याची शक्यता असली, तरी अचानक डिलिस्ट होऊन त्यात मोठया प्रमाणात पैसे अडकून नुकसान होण्याची शक्यता देखील असेत. त्यामुळे अनेकजण अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करणे टाळतात.
संबंधित बातम्या
नवे कृषी कायदे रद्द झाल्याचा उद्योग क्षेत्राला फटका ; कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीचा ओघ कमी होणार?