मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा नोकर सॅम्युअल मिरांडाच्या घराबाहेर मुंबई पोलीस तैनात झाले आहेत (Mumbai Police reached at Samuel Miranda house). मात्र, सॅम्युअलचं नाव याप्रकरणात आल्याने त्याच्या शेजाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. मुंबई पोलीस सॅम्युअलच्या घराबाहेर पोहोचताच त्याच्या शेजारच्यांनी आरोडओरड सुरु केली. यावेळी सॅम्युलचे शेजारी आणि पोलीस आमनेसामने आले. थोड्यावेळाने पोलीस तेथून निघून गेले. मात्र, सॅम्युअलच्या घराबाहेर नजर ठेवण्यासाठी हवलदार तैनात करण्यात आले आहेत (Mumbai Police reached at Samuel Miranda house).
सॅम्युअल मिरांडा हा पाटणा पोलिसांच्या एफआयआरमध्ये आरोपी आहे. “रियाने सॅम्युअलच्या नावाने नवं सिमकार्ड घेतलं होतं. सुशांतची त्याच्या वडिलांसोबत ताटातूट व्हावी, यासाठी रियाने त्याचा नंबर बदलला”, असा आरोप सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केला आहे. याप्रकरणी पाटणा पोलिसांचा तपास सुरु आहे.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी त्याचे वडीले के. के. सिंह यांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात बिहारच्या पाटणा येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. के. के. सिंह यांनी रियासह तिच्या कुटुंबीय आणि सुशांतचा नौकर सॅम्युअल मिरांडाविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाच्या तपासासाठी बिहार पोलीस चार दिवसांपूर्वी मुंबईत दाखल झाले आहेत.
बिहार पोलिसांनी मुंबई दाखल झाल्यापासून तपासाचा धडाकाच लावला आहे. त्यांनी सुशांतची मैत्रिण अंकिता लोखंडेचा जबाब नोंदवला आहे. याशिवाय त्यांनी सुशांतच्या बँक खात्यांची माहिती मिळवली आहे. आता ते दिग्दर्शक रुमी जाफरी यांचा जबाब नोंदवणार आहेत. रुमी जाफरी सुशांत आणि रियासोबत एक चित्रपट बनवणार होते. त्याबाबतच बिहार पोलीस चौकशी करण्याची शक्यता आहे.
मुंबई पोलिसांकडून सहकार्य : बिहार पोलीस
दरम्यान, मुंबईत सुरु असलेल्या तपासात मुंबई पोलिसांकडून सहकार्य मिळत असल्याची माहिती बिहार पोलिसांनी दिली आहे. त्यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबाबत प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती देण्यास नकार दिला. “काही दिवसांनी बिहार येथून मोठे पोलीस अधिकारी येतील. ते याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन माहिती देतील”, असं बिहार पोलिसांनी सांगितलं.
“रियावर एफआयआरमध्ये आरोप आहेत. याप्रकरणी जी कायदेशीर कारवाई असेल ती केली जाईल. पण शेवटी रियासाठी लुकआऊट नोटीस जारी करायची की नाही ते कोर्ट ठरवेल”, अशी प्रतिक्रिया बिहार पोलिसांनी दिली आहे.
बिहार पोलिसांना सुशांतचा पोस्टमोर्टम रिपोर्ट देण्यास कूपर रुग्णालयाचा नकार
बिहार पोलीस आज मुंबईतील कूपर रुग्णालयातही दाखल झाले. पोलिसांनी रुग्णालय प्रशासनाकडे सुशांतचा पोस्टमार्टम रिपोर्ट मागितला. मात्र, रुग्णालय प्रशासनाने पोस्टमोर्टम रिपोर्ट देण्यास नकार दिला.
संबंधित बातम्या :
रियासोबत सुशांतच्या बहिणीचा वाद, पाटणा पोलिसांच्या चौकशीत माहिती