Pune School reopen | पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, महापौरांची घोषणा

मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता पुणे महापालिका क्षेत्रातीलही सर्व शाळा 13 डिसेंबरर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत (Murlidhar Mohol announced school remain closed till 13 december in Pune).

Pune School reopen | पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, महापौरांची घोषणा
Follow us
| Updated on: Nov 21, 2020 | 5:34 PM

पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. पुणे महापालिका क्षेत्रातील खासगी आणि महापालिका शाळा बंद राहणार आहेत. 13 डिसेंबरला कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा उघडण्याबाबत निर्णय घेऊ, असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे. याआधी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता पुणे महापालिका क्षेत्रातीलही सर्व शाळा 13 डिसेंबरर्यंत बंद राहणार आहेत (Murlidhar Mohol announced school remain closed till 13 december in Pune).

दिवाळीनंतर पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये थंडीचं वातावरण पाहता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्य विभागाकडून आधीच माहिती देण्यात आली आहे. या लाटीला परतून लावण्यासाठी महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झालं आहे. आगामी संकट लक्षात घेऊन प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.

दरम्यान, “शाळा सुरु करण्याचा निर्णय हा ऐच्छुक असेल. प्रत्येक जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करुन निर्णय घ्यावा”, अशा सूचना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत (Murlidhar Mohol announced school remain closed till 13 december in Pune).

“शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन आणि पालकांकडे सोडला आहे. शाळा सुरु केल्यामुळे आपल्या मुलाला बाधा होऊ शकते, असं पालकांना वाटत असेल तर शिक्षकांनी आधी पालकांशी चर्चा करुन याबाबत निर्णय घ्यावा”, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

कोणत्या जिल्ह्यात शाळा सुरु होणार?

कोरोना संकट आणि लॉकडाऊमुळे बंद असलेल्या शाळा येत्या 23 नोव्हेंबरपासून (school reopen) सुरु होण्याचा निर्णय ठाकरे सरकारने (Thackeray Sarkar) घेतला आहे. त्यानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरवण्याचे नियोजन आहे. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने, शाळा उघडण्याबाबत अनेक जिल्ह्यात संभ्रम दिसत आहे. राज्य सरकारने शाळांबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर सोपवल्याने या संभ्रमात आणखी भर पडली आहे. नेमका कोणता निर्णय घ्यायचा?, पालकांची संमती कशी मिळवायची?, विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये याबाबत खबरदारी कशी घ्यायची? शिवाय 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असली तरी 50 टक्के विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाईन असेल, ते मॅनेज कसं करायचा असा प्रश्न शिक्षक आणि प्रशासमोर आहे.

औरंगाबाद शहरातील शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद

औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारपासून (२३ नोव्हेंबर) शाळा सुरु होणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. मात्र महापालिका क्षेत्रातील शाळा 3 जानेवारीपर्यंत बंद राहतील असं, पालिका आयुक्तांनी सांगितलं.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत शाळा बंद

मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत. याशिवाय ठाणे आणि पनवेलमधील शाळाही बंद राहणार आहेत. त्यानुसार येत्या 31 डिसेंबरपर्यंत मुंबई, ठाणे, पनवेलमधील शाळा बंदच ठेवण्यात येणार आहेत.

पुण्यात 13 डिसेंबरपर्यंत शाळा बंद 

‘पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार’, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती, 13 डिसेंबरला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार, पालकांशी चर्चा करुन आणि सद्यस्थिती लक्षात घेऊन निर्णय, पुण्यातील महापालिका आणि खासगी शाळा बंदच राहणार

नाशिकमधीळा शाळांबाबत रविवारी निर्णय

नाशिकमधील शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घ्यावा, की पुढे ढकलावा याबाबत तातडीची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री तसेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात सोमवारपासून शाळा सुरू होणार आहेत. पहिल्या दिवशी 60 हजार विद्यार्थी शाळेला उपस्थित राहतील असा अंदाज आहे. दुसऱ्या दिवशी 60 हजार विद्यार्थी उपस्थित राहतील.

कोणत्या जिल्ह्यात शाळा सुरु, कुठे बंद?

  • मुंबई, ठाणे, पनवेल – 31 डिसेंबरपर्यंत बंद
  • नाशिक – रविवारी अंतिम निर्णय
  • पुणे – 13 डिसेंबरपर्यंत शाळा बंद
  • अहमदनगर – 23 नोव्हेंबरपासून सुरु
  • नागपूर – शाळा सुरु होणार
  • कोल्हापूर – शाळांचं सॅनिटायझेशन सुरु
  • रत्नागिरी- अद्याप कुठलाही निर्णय नाही
  • सिंधुदुर्ग- अद्याप कुठलाही निर्णय नाही
  • रायगड – पनवेल वगळून 23 तारखेपासून शाळा सुरु
  • सोलापूर – सोमवारपासून शाळा सुरु
  • औरंगाबाद – शहरातील शाळा  3 जानेवारीपर्यंत बंद राहणार
  • नांदेड – नववी ते बारावीची शाळा सोमवारपासून होणार सुरू
  • बीड -अद्याप कुठलाही निर्णय नाही
  • नंदुरबार – सोमवारी सुरू होणार

संबंधित बातमी :

School Teachers Corona | उस्मानाबादेत 48, बीडमध्ये 25, कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह?

शाळा उघडण्याबाबत स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण, वर्षा गायकवाड यांची स्पष्टोक्ती 

दिल्ली इफेक्ट, मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचा निर्णय

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.