kangana ranaut | संगीतकार वाजिदच्या निधनानंतर पत्नीचे सासरवर गंभीर आरोप, कंगनाचा पंतप्रधानांना प्रश्न
संगीतकार वाजिद खान यांच्या निधनाला पाच महिने उलटल्यानंतर त्याची पत्नी कमलरुखने सासरच्या मंडळींवर छळाचा आरोप केला आहे. इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा दावा तिने केला.
मुंबई : संगीतकार वाजिद खान (wajid khan)यांच्या निधनाला पाच महिने उलटल्यानंतर त्याची पत्नी कमलरुखने सासरच्या मंडळींवर छळाचा आरोप केला आहे. इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा दावा तिने केला. या प्रकरणात अभिनेत्री कंगना रनौतने (kangana ranaut) उडी घेत थेट पंतप्रधानांनाच सवाल केला आहे.(musician Wajid khan, his wife made serious allegations against his father-in-law, Kangana questioned the Prime Minister)
She is my friends widow a parsi woman who is being harassed by her family for conversion. I want to ask @PMOIndia minority that don’t do sympathy seeking drama, beheadings, riots and conversions, how are we protecting them? Parsis shockingly decreasing numbers ( cont.)
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 29, 2020
कोरोनाचा इतर क्षेत्राप्रमाणे बॉलिवूडमध्येही वाईट परिणाम झाला. याकाळात अनेक निर्माते व दिग्दर्शकांचे नुकसान झाले. तर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी जगाचा निरोप घेतला. यामध्ये साजिद-वाजिद या प्रसिद्ध जोडीतील वाजिदचे 1 जून 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या 5 महिन्यांनंतर त्याची पत्नी कमलरुख यांनी त्यांच्या सासरच्यांवर छळ केल्याचा आरोप केला आहे. कमलरुखचा आरोप आहे की, त्यांचे सासरे त्यांच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत आहेत. आता याप्रकरणात कंगना रनौतने ट्विट करत यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. कंगनाने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मला पंतप्रधान कार्यालयाला विचारायचे आहे, अल्पसंख्याक समाज जे कुठलीही सहानुभूती मिळवणारी नाटकं, शिरच्छेद, दंगली, धर्मांतर करत नाहीत, त्यांचे आपण रक्षण कसे करत आहात? पारसी समाजाची संख्या धक्कादायक पद्धतीने घटत चालली आहे.
My first hand account of life in an inter caste marriage #anticonversionbill pic.twitter.com/RZwZdFb84O
— Kamalrukh Khan (@kamalrukhkhan) November 27, 2020
प्रख्यात संगीतकारद्वयी साजिद-वाजिद यांच्यापैकी वाजिद खान यांचे मुंबईत अकस्मात निधन झाले होते. मूत्रपिंडाच्या संसर्गामुळे उद्भवणार्या गुंतागुंतीमुळे त्यांचे निधन झाले. ते अवघ्या 42 वर्षांचे होते. दबंग सिरीज, पार्टनर, वॉन्टेड, एक था टायगर, टायगर जिंदा है, गर्व, मुझसे शादी करोगे अशा चित्रपटांतील एकापेक्षा एक गाजलेली गाणी साजिद-वाजिद यांनी संगीतबद्ध केली होती.
वाजिद खान यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्यांची कोविड चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत होती. तबलावादक उस्ताद शराफत अली खान यांचे दोन पुत्र साजिद-वाजिद यांनी अल्पकाळात मनोरंजन विश्वात नाव कमावले होते. 1998 मध्ये साजिद-वाजिद यांनी सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटाला संगीत देऊन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर चोरी चोरी, हॅलो ब्रदर, मुझसे शादी करोगी, पार्टनर, वॉन्टेड आणि दबंग अशा सुपरस्टार सलमानच्या चित्रपटांसाठी त्यांनी अनेक अल्बम बनवले. सलमानच्या ‘भाई भाई’ गाण्याला दिलेली धून वाजिद यांची अखेरची प्रसिद्ध गीतमाला ठरली.
गायक म्हणून वाजिद खान यांनी 2008 मध्ये पार्टनरसाठी पहिले गाणे गायले. “हुड हुड दबंग”, “जलवा”, “चिंता ता चिता चिता” आणि “फेव्हीकॉल से” यासारखे ट्रॅक त्यांनी लोकप्रिय केले.
संबंधित बातम्या :
Kangana Ranuat | ‘तुम्हाला निलंबित केले पाहिजे’, कंगना रनौत महिला आयपीएस अधिकाऱ्यावर संतापली!
कंगना रनौत हाजीर हो! मुंबई पोलिसांकडून कंगनासह रंगोलीला तिसऱ्यांदा समन्स
(musician Wajid khan, his wife made serious allegations against his father-in-law, Kangana questioned the Prime Minister)