कोरोना महामारीनं समाजात सेवाभाव पुन्हा जागृत केला, समाज एकत्र येतोय – भागवत

नागपुरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पार पडला. कोरोनामुळं समाजामध्ये पुन्हा एकदा सेवाभाव जागृत केला आहे. कोरोना महामारीच्या काळात समाज एकरुप होताना दिसत आहे, असं मत मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात व्यक्त केलं.

कोरोना महामारीनं समाजात सेवाभाव पुन्हा जागृत केला, समाज एकत्र येतोय - भागवत
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 9:54 AM

नागपूर: ‘जगभरात सध्या कोरोना महामारीनं थैमान घातलं आहे. कोरोनामुळं अनेकांचा बळी गेला, आर्थिक, औद्योगिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. पण या कोरोनामुळं समाजामध्ये पुन्हा एकदा सेवाभाव जागृत केला आहे. कोरोना महामारीच्या काळात समाज एकरुप होताना दिसत आहे’, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. नागपुरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला मोजकेच स्वयंसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. मात्र ऑनलाईनच्या माध्यमातून देशभरातील स्वयंसेवक या दसरा मेळाव्यात सहभागी झाले. (RSS mohan bhagwat on corona and society)

भारतीय संस्कृतीचं मूल्य असलेला सेवाभाव आपण विसरलो होतो. पण कोरोना काळात तो पुन्हा एकदा जागृत झाला आहे. समाजातील प्रत्येक घटकानं या काळात एकमेकांना सहाय्य केल्याचं पाहायला मिळालं, अशी भावना मोहन भागवत यांनी व्यक्त केली. कोरोनामुळं अनेकांचा मृत्यू झाला, कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करणारे अनेक डॉक्टर आणि कर्मचारीही मृत पावले. त्यांना भागवत यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तसंच निस्वार्थ भावनेनं सेवा करणाऱ्यांचं अभिनंदनही त्यांनी आपल्या भाषणात केलं. कोरोनामुळं निर्माण झालेल्या आर्थिक, सामाजिक परिणामांतून स्वत:ला आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी मदत करा, असं आवाहनही भागवत यांनी जनतेला केलं आहे.

कोरोनाकाळात अनेक मजूर गावी गेले. त्यातील काही आज परतले आहेत. पण काही क्षेत्रात कामाच्या पद्धती बदलल्या आहेत. त्यामुळं कामगारांना नव्याने प्रशिक्षण देणं गरजेचं असल्याचं मत भागवत यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर पालकांच्या नोकऱ्या गेल्यानं अनेक संस्थाचालकांना विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क मिळालं नाही. त्यामुळं हजारो शिक्षकांचे पगार रखडले आहेत. अशावेळी शिक्षण क्षेत्रात सातत्याने बदलाची गरजही भागवत यांनी व्यक्त केली. कोरोनाचे जसे वाईट परिणाम पाहायला मिळत आहेत. तसेच निसर्ग पुन्हा एकदा समृद्ध झालेला पाहायला मिळाल्याचं यावेळी भागवत म्हणाले.

‘तुकडे-तुकडे गँग’वर भागवतांचा हल्लाबोल –

भारत ते तुकडे होंगे म्हणणारेच वेळप्रसंगी संविधानाचे दाखले देतात. अशा लोकांपासून समाजानं साधव राहणं गरजेचं आहे. असे लोक संघाबाबत चुकीचं मत पसरवण्याचं काम करत आहेत. पण संध आपल्या कर्तव्याप्रती एकनिष्ठ असल्याचा विश्वास सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या:

मित्रता टिकवतो म्हणजे आम्ही कमजोर नाही, लडाख सीमेवरील भारतीय सैन्याच्या शौर्यानंतर भागवतांचा शत्रूराष्ट्रांना इशारा

RSS Vijayadashami Utsav | कोरोनामुळे संपूर्ण समाज एकरुप झाला : मोहन भागवत

RSS mohan bhagwat on corona and society

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.