नागपुरातील बहुप्रतिक्षित डबल डेकर पूल लवकरच सुरु होणार, मेट्रो अधिकाऱ्याचा दावा

मेट्रो विभागाकडून येत्या एक महिन्यात या पुलाचे बांधकाम पूर्ण होईल, असे अनिल कोकाटे यांनी सांगितले.  (Nagpur Double decker bridge will be open for citizens) 

नागपुरातील बहुप्रतिक्षित डबल डेकर पूल लवकरच सुरु होणार, मेट्रो अधिकाऱ्याचा दावा
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 4:30 PM

नागपूर : बहुप्रतिक्षित असा नागपुरातील वर्धा-नागपूर मार्गावरील डबल डेकर पूल लवकरच नागरिकांसाठी खुला होणार आहे. गेल्या काही दिवसापासून या पुलाचे काम सुरु आहे. मात्र येत्या महिनाभरात हे काम पूर्ण होईल, असा दावा मेट्रो अधिकारी अनिल कोकाटे यांनी केला आहे. (Nagpur Double decker bridge will be open for citizens)

नॅशनल हायवे नंबर 7 वरील हा डबल डेकर पूल हा महाराष्ट्रातील पहिला पूल असणार आहे. यातील वरच्या पुलावरुन मेट्रो तर खालच्या पुलावर वाहतूक असणार आहे. त्याशिवाय त्याखाली नियमित रस्ते वाहतूक असेल, असेही अनिल कोकाटे यांनी सांगितले.

नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर काही वर्षांपासून ट्राफिक जामची समस्या होती. मात्र आता या समस्येतून नागपूरकरांना दिलासा मिळणार आहे.

साडेतीन किलोमीटर लांबीचा असलेला हा पूल अजनी चौक ते विमानतळपर्यंत आहे. शिवाय शहरातील इतरही भागात जाण्यासाठी यात अंतर्गत पुलांचाही समावेश करण्यात आला आहे. या पुलाचे काम नागपूर मेट्रोद्वारे सुरु आहे. त्यामुळे मेट्रो विभागाकडून येत्या एक महिन्यात या पुलाचे बांधकाम पूर्ण होईल, असे अनिल कोकाटे यांनी सांगितले.

त्यानंतर नॅशनल हायवे अथॉरिटीकडे हा पूल सुपूर्द करण्यात येईल. या पुलाच्या बांधकामाला 409 कोटी रूपये खर्च आला असून देशातील सर्वात आगळा वेगळा पूल असल्याची प्रतिक्रिया मेट्रो अधिकारी अनिल कोकाटे यांनी दिली.

नागपूरमध्ये मेट्रोच्या माध्यमातून शहरात अनेक काम करण्यात आले आहे. आता हा डबल डेकर पूल साकारण्यात आला असून या पुलाचा शहराला फायदा होईल. त्यासोबतच शहराच्या वैभवात सुद्धा वाढ होईल, असेही कोकाटे म्हणाले. (Nagpur Double decker bridge will be open for citizens)

संबंधित बातम्या : 

शेतकऱ्यानं सोयाबीनच्या पिकात सोडली जनावरं!, कापणीचा खर्चही निघणार नसल्यानं बळीराजा हतबल

इंद्रावती नदीत प्रवाशांनी भरलेली नाव बुडाली; 13 जणांना वाचवले, चारजण बेपत्ता

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.