नागपूरच्या नवनियुक्त आयुक्तांचा तुकाराम मुंढेंच्या पावलावर पाऊल, तब्बल 66 कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

नागपूर मनपाचे नवनियुक्त आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर ते तातडीने अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत (Nagpur Municipal Commissioner cause notice to 66 employees).

नागपूरच्या नवनियुक्त आयुक्तांचा तुकाराम मुंढेंच्या पावलावर पाऊल, तब्बल 66 कर्मचाऱ्यांना 'कारणे दाखवा' नोटीस
Follow us
| Updated on: Sep 01, 2020 | 8:47 PM

नागपूर : नागपूर महापालिकेच्या आयुक्त पदावरुन आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर मनपा कर्मचारी कार्यालयात पुन्हा उशिरा येऊ लागले आहेत. त्यामुळे नवनियुक्त आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर ते तातडीने अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनीदेखील माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पावलावर पाऊल ठेवत मनपाच्या तब्बल 66 कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’  नोटीस बजावली आहे (Nagpur Municipal Commissioner cause notice to 66 employees).

आयुक्त राधाकृष्णन यांनी आज (1 सप्टेंबर) मनपा मुख्यालयातील विविध विभागांना अचानक भेट दिली. यावेळी बरेच कर्मचारी विनामंजुरी सुट्टीवर गेल्याचं समोर आलं. त्याचबरोबर काही कर्मचारी उशिरा येत असल्याचं राधाकृष्णन यांच्या निदर्शनास आलं. मनपा कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार कारभाराविरोधात नवनियुक्त आयुक्तांनी तातडीने कारवाई केली. तब्बल 66 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

मनपा कार्यालयात यापुढे कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी उशिरा आला तर कारवाई होईल, असा इशारा आयुक्त राधाकृष्णन यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांनी नेहमी वेळेत यावं. सुट्टी हवी असल्यास नियमानुसार मंजुरी घ्यावी, असं राधाकृष्णन यांनी बजावलं आहे.

तुकाराम मुंढे यांनी नागपूर मनपाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चार कर्मचाऱ्यांना दणका दिला होता. कामात अनियमितता आढळल्यानं लेखा आणि वित्त विभागातील चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश, तुकाराम मुंढे यांनी दिले होते. त्यांनी रुजू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लेखा आणि वित्त विभागाची पाहणी केली होती. त्यानंतर आता नागपूर मनपाचे नवनियुक्त आयुक्त राधाकृष्णन बी. यांनीदेखील 66 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे (Nagpur Municipal Commissioner cause notice to 66 employees).

संबंधित बातम्या :

दुसऱ्याच दिवशी ‘फैसला ऑन द स्पॉट’, तुकाराम मुंढेंचा चार कर्मचाऱ्यांना दणका!

तुकाराम मुंढेंचे ‘छडी लागे छमछम’, कर्मचाऱ्यांसाठी सहा नियमांचं पत्रक

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.