नागपूर महापालिकेची गांधीगिरी, मास्क न वापरणाऱ्यांसाठी अशी आहे शिक्षा

| Updated on: Nov 26, 2020 | 7:31 PM

मास्क न घालणाऱ्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी नागपूर महापालिकेने (nagpur Municipal Corporation) गांधीगिरी वापरण्याचं ठरवलं आहे.

नागपूर महापालिकेची गांधीगिरी, मास्क न वापरणाऱ्यांसाठी अशी आहे शिक्षा
महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्या व्यक्तीला 1 तास झाडूने रस्ता स्वच्छ करावा लागतो.
Follow us on

नागपूर : गेल्या 8 महिन्यांपासून कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे (Corona Pandamic) संपूर्ण जगात हाहाकार सुरू आहे. पण तरीदेखील मास्क (Mask) न घालत नियम मोडणारे कमी नाही आहेत. यावर आता कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी नागपूर महापालिकेने (nagpur Municipal Corporation) गांधीगिरी वापरण्याचं ठरवलं आहे. मास्क न घालणाऱ्या बेजबाबदार नागरिकांकडून आता दंड वसूल करुन , महापालिका त्यांना मास्क देणार असल्याचं ठरवण्यात आलं आहे. (nagpur Municipal Corporation will give masks to the irresponsible citizens who do not wear masks)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आतापर्यंत मास्क न घालणाऱ्या तब्बल 21479 नागरिकांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे. मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजाबदार नागरिकांना नागपूर महानगरपालिकेव्दारे 500 रुपये दंड वसूल करून मास्क देण्यात येणार आहे. यासंबंधी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी नागरिकांच्या जीवन पध्दतीमध्ये सुधारणा करण्यासाठी दंड केल्यानंतर मास्क देण्याचे आदेश दिले आहे.

या माध्यमातून नागरिकांमध्ये मास्क लावण्याची वृत्ती निर्माण होईल. असा महापालिकेला विश्वास आहेत. त्यामुळे पालिकेच्या या खऱ्या प्रयत्नाला आता नागपूरकर कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरंतर, दिवाळीनंतर कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. इतकंच नाही तर यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर करत कोव्हीडचे नियम पाळावे अशा वारंवार सूचना पालिकेकडून देण्यात येत आहेत. (nagpur Municipal Corporation will give masks to the irresponsible citizens who do not wear masks)

दरम्यान, देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासह देशाची राजधानी दिल्लीपर्यंत सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मुंबईत विनामास्क फिरताना आढळल्यावर नागरिकांना आता 200 रुपये दंड भरावा लागणार आहे, तर हीच दंडाची रक्कम दिल्लीमध्ये 2000 हजार रुपये इतकी आहे.

इतर बातम्या –

विनामास्क फिरताना आढळल्यास राज्यासह देशातील विविध भागात किती रुपयांचा दंड भरावा लागणार?

Aurangabad | औरंगाबादमध्ये विनामास्क ग्राहकाला सामान देण्यास बंदी

 

(nagpur Municipal Corporation will give masks to the irresponsible citizens who do not wear masks)