पगार मिळवण्यासाठी शिक्षकाचा अजब फंडा, चक्क शाळेतच थाटला संसार
नांदेडमधल्या शिक्षकाने पगार मिळत नसल्यामुळे एक हटके उपाय केला आहे.
नांदेड : राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून शाळा आणि कॉलेज बंद आहे. संक्रमणाचा धोका कमी होताना दिसत नसल्यामुळे अजूनही शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. पण यामुळे शिक्षकांवर मोठं आर्थिक संकट ओढावलं आहे. मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झालं आणि अनेक शिक्षकांना घरी बसण्याची वेळ आली. अशात वेतनही मिळत नसल्यानं आर्थिक अडचण सोडवण्यासाठी आणि सरकारची मदत मिळवण्यासाठी शिक्षकांनी आंदोलन केलं तर कोणी परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण नांदेडमधल्या शिक्षकाने पगार मिळत नसल्यामुळे एक हटके उपाय केला आहे. (nanded news to get a salary teacher started staying at school with his family)
नांदेडच्या अर्धापूरमध्ये एका शिक्षकाने वेतनाच्या मागणीसाठी शाळेतच संसार थाटला आहे. भास्कर लोखंडे असं या शिक्षकाचं नाव असून ते गेल्या 22 वर्षांपासून खासगी शाळेत शिकवत आहेत. मात्र, वेळोवेळी मागणी करूनही अद्याप त्यांचे वेतन सुरू झालेल नाही. अशात कोरोनाच्या संकटात घरावर आर्थिक संकट ओढावलं आहे. बऱ्याच वेळा सरकारची मदत मागितली पण यावर कोणतंही उत्तर न मिळाल्यामुळे शिक्षकाने टोकाचं पाऊल उचलत शाळेतच संसार थाटला आहे.
या शिक्षकाने आपल्या मुलाबाळांसह शाळेतच बिऱ्हाड मांडलं आहे. दरम्यान, या शिक्षकांचे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना त्यांची ही कृती चुकीची असल्याचा दावा संस्थेने केला आहे. तर आपल्याला न्याय मिळेपर्यंत आपण शाळेतच राहणार असल्याचं शिक्षकाने सांगितलं आहे.
खरंतर, कोरोनाच्या काळात पगार मिळत नसल्यामुळे शिक्षकांनी टोकाचं पाऊल उचलल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. गेल्या काही दिवसांआधी मुंबईतील आमदार निवासावर चढून एका शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. वेतन मिळत नसल्याने आमदार निवासावरील चौथ्या मजल्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न केला गेला. या घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून त्या शिक्षकाला समजवण्यात आलं होतं.
इतर बातम्या –
कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी Good News, रोज फक्त 28 रुपयांच्या खर्चावर मिळवा बक्कळ पैसे
हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार मालक सावधान, अन्यथा कायमचा होईल परवाना रद्द
Thane | मराठा समाजावर ही वेळ भाजप सरकारमुळेच, हरीभाऊ राठोडांचा निशाणा – tv9 pic.twitter.com/lbNB3u4cgh
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 8, 2020
(nanded news to get a salary teacher started staying at school with his family)