पब्जी खेळताना हार्ट अटॅक, 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू
पब्जी गेम खेळत असतानाच 18 वर्षीय राजेश नंदू राठोडला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला.
नांदेड : मोबाईलवर पब्जी गेम खेळत असतानाच हार्ट अटॅक आल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नांदेडमधील 18 वर्षीय युवकाने उपचारापूर्वीच अखेरचा श्वास घेतला. (Nanded Youth Dies of Heart Attack while Playing PUBG online game)
नांदेड जिल्ह्यात माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पार्डी गावातील ही घटना आहे. 18 वर्षीय राजेश नंदू राठोड हा तरुण आपल्या मोबाईलवर पब्जी गेम खेळत होता. गेम सुरु असतानाच राजेशला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला.
राजेशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जोरदार हार्ट अटॅक आल्याने त्याची प्राणज्योत मालवल्याची माहिती आहे.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
राजेशच्या अकस्मात मृत्यूने राठोड कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. तरुण मुलाच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेने माहूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पब्जी खेळाच्या नादात मानसिक संतुलन हरवल्याच्या काही घटना याआधीही देशाच्या कानाकोपऱ्यातून ऐकायला मिळाल्या आहेत. पब्जीच्या नादात अनेक तरुणांचे आरोग्य धोक्यात आल्याने पालकवर्गाकडून या ऑनलाईन गेमवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.
VIDEO : टॉप 9 न्यूज | 26 July 2020 https://t.co/0mYfGAMm3t
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 26, 2020
संबंधित बातमी :
ब्लास्ट करो…ब्लास्ट करो…, पब्जी खेळताना तरुणाचा मृत्यू
(Nanded Youth Dies of Heart Attack while Playing PUBG online game)