परीचा फ्रॉक, हातात जादूची छडी, पाच वर्षाच्या चिमुरडीची कोरोनावर मात, फुलांच्या वर्षावात डॉक्टरांकडून स्वागत
नाशिक जिल्ह्यात आज (19 मे) एका पाच वर्षाच्या चिमुरडीने कोरोनार मात केली आहे. त्यामुळे तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला (Nashik Corona Recovery Cases).
नाशिक : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी (Nashik Corona Recovery Cases) कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील हळूहळू वाढू लागली आहे. नाशिक जिल्ह्यात आज (19 मे) एका पाच वर्षाच्या चिमुरडीने कोरोनार मात केली आहे. त्यामुळे तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयात डिस्चार्ज देताना तिचं रुग्णालयाबाहेर अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं. या भावनिक प्रसंगी डॉक्टरांनी फुलांचा वर्षाव करत चिमुरडीचं स्वागत केलं (Nashik Corona Recovery Cases).
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वडगावच्या एका पाच वर्षीय चिमुकलीला कोरोनाची लागण झाली होती. गेल्या 16 दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरु होते. डॉक्टरांच्या यशस्वी उपचारानंतर आता ही चिमुरडी पूर्णपणे ठणठणीत बरी झाली आहे. चिमुकलीने 16 दिवसात कोरोनावर मात केली. त्यामुळे तिला आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
चिमुकलीने कोरोनावर मात केल्यामुळे उपचार करणारे डॉक्टर आणि रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. चिमुकलीला डिस्चार्ज देताना तिचं रुग्णालयाबाहेर अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं. या चिमुकलीने पांढराशुभ्र परीचा फ्रॉक परिधान केला होता. याशिवाय तिच्या हातात जादूची धडी देण्यात आली होती. डोक्यावर फुलं खोवलेली होती. अशा पेहरावात चिमुकली रुग्णालयाबाहेर येताच डॉक्टरांनी फुलांचा वर्षाव करत तिचं स्वागत केलं. चिमुकलीने सर्वांचा निरोप घेतला. त्यानंतर ती आपल्या आई-वडिलांसोबत घरी जाण्यासाठी गाडीत बसली.
राज्यात दिवसभरात 1202 रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात दिवसभरात 1 हजार 202 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे या सर्व रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 9 हजार 639 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 26 हजार 164 रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा संख्या 37 हजार 136 वर पोहोचली आहे.
संबंधित बातमी :
राज्यात एकाच दिवसात सर्वाधिक 76 कोरोनाबळी, बाधितांचा आकडा 37 हजार पार