पर्यटकांची बेपर्वाई, नांदूर मध्यमेश्वर धरणातून विसर्ग सुरु असूनही सेल्फी फोटोग्राफीसाठी गर्दी
जून महिन्यापासून दडी मारलेल्या पावसानं नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यात हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील छोटी मोठी धरण भरली आहेत.
नाशिक: जून महिन्यापासून दडी मारलेल्या पावसानं नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यात हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील छोटी मोठी धरण भरली आहेत. नाशिक जिल्ह्यातीन निफाड जवळील नांदूर मध्यमेश्वर धरणावर पर्यटकांनी गर्दी केल्याचं समोर आलं आहे. हौशी पर्यटकांनी सेल्फी फोटोग्राफीसाठी निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर धरणासमोरील पुलावर पाण्याचा विसर्ग सुरु असताना गर्दी केली होती. जीवाची पर्वा न करता पर्यटक फोटो काढण्यात व्यस्त होते. निफाडचे उपविभागीय अधिकारी धरणाची पाहणी करण्यासाठी आलेले असतानाही लोक फोटो काढण्यात व्यस्त होते.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात संततधार पाऊस होत असल्याने दारणा 5 हजार 140 तर गंगापुर धरणातून 3 हजार 068 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पुराचं पाणी दाखल होत असल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रात जायकवाडीच्या दिशेने 6 हजार 512 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ केली जाणार असल्याने धरणावर पाहणी करण्यासाठी निफाड उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे आल्या होत्या.
सेल्फी फोटोग्राफीचं प्रमाण वाढलं
धरणातून विसर्ग सुरु असताना मोठ्या प्रमाणात धाडस करून सेल्फी फोटोग्राफीचे प्रमाण वाढल्याचे दिसले. पाण्याचा विसर्ग सुरु असताना त्या ठिकाणी पोलीस नसल्याने जीवघेणा सेल्फी व स्टंटबाजी प्रकार होत असल्याचं अर्चना पठारे यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना सांगितलं. जोपर्यंत विसर्ग सुरु आहे तोपर्यंत या धरणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचं बोललं जातंय.
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग
नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात समाधान कारक पाऊस पडत असल्याने आज गंगापूर धरणातून वेगाने गोदा पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. गंगापूर धरणाचा पाणी साठा 80 टक्क्यांवर गेल्याने हा विसर्ग सुरू केला गेलाय, अशी माहिती आहे.
भावली धरणाचं पाणी शहापूरला देणार नाही, नरहरी झिरवळ यांची भूमिका
इगतपुरी तालुक्याची जलवाहिनी असणाऱ्या भावली धरणासाठी तालुक्यातील भूसंपादनाकरिता अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्यात. त्यासाठी इगतपुरी तालुक्याच्या शेतकऱ्यांनी मोठा त्याग केलाय. त्यांचे हक्काचे पाणी केवळ तालुकावासीयांच मिळणार आहे. त्यामुळे भावली धरणाचे पाणी शहापूरला जाऊच देणार नाही, असा इशारा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिला.
इतर बातम्या:
भावली धरणाचे पाणी शहापूरला देणार नाही, नरहरी झिरवळांचा पवित्रा
मनसेची पहिली मोठी घोषणा; नाशिक मनपा निवडणूक अमित ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार!
Nashik Nifad NandurMadyameshwar release water in Godavari river travellers taking selfies with violate corona rules