कराटेत सुवर्णपदक मिळवणारी झारखंडची कन्या विमला मुंडा सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. कराटेत अनेक पदकं मिळवूनही घरची परिस्थिती बेताची असल्याने ती सध्या देशी दारु विकून आपला उदरनिर्वाह आहे (National karate player Vimla Munda selling alcohol due to poverty).
Follow us
कराटेत सुवर्णपदक मिळवणारी झारखंडची कन्या विमला मुंडा सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. कराटेत अनेक पदकं मिळवूनही घरची परिस्थिती बेताची असल्याने ती सध्या देशी दारु विकून आपला उदरनिर्वाह करते.
झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना विमलाच्या परिस्थितीची माहिती मिळताच त्यांनी या गोष्टीला गांभीर्याने घेतलं आहे. त्यांनी क्रिडा सचिवांना साहाय्य करण्याचा आदेश दिला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करुन माहिती दिली.
“सरकारचं खेळाडूंकडे कधी लक्षच नाही गेलं. मग तो खेळाडू कराटेचा असेल किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही खेळाचा”, अशी व्यथा विमलाने मांडली आहे.
2011 साली झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत विमलाने सिल्व्हर मेडल जिंकलं होतं. त्यानंतर 2014 साली झालेल्या आंतरराष्ट्रीय खेळात तिने सुवर्णपदक मिळवलं होतं.
याशिवाय अनेक स्पर्धांमध्ये तिने सुवर्ण पदकं मिळवलं आहे.
विमलाने वाणिज्य शाखेतून पदवी घेतली आहे. ती सध्या आपल्या आजोबांसह रांचीच्या पतरा गोंडा येथे वास्तव्यास आहे.