Navratri 2020 | राज्यात शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात, मंदिर ओस, भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन
दरवर्षी मोठ्या जल्लोषात 9 दिवस साजरा केला जाणारा नवरात्रीचा उत्सव यंदा साधेपणाने साजरा केला जात आहे. (Navratri 2020 Celebration in Maharashtra)
मुंबई : आई जगदंबेचं शक्ती स्वरूप साजरा होणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून (17 ऑक्टोबर) सुरुवात झाली आहे. दरवर्षी मोठ्या जल्लोषात 9 दिवस साजरा केला जाणारा नवरात्रीचा उत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा केला जात आहे. दरवर्षी घटस्थापनेदिवशी महाराष्ट्रातील सर्व देवींच्या मंदिरात अलोट गर्दी असते. मात्र कोरोनामुळे राज्यातील सर्व मंदिर भाविकांसाठी बंद आहे. तरीदेखील अनेक भाविक गेट बाहेरुनच देवीला नतमस्तक होताना पाहायला मिळत आहेत. (Navratri 2020 Celebration in Maharashtra)
राज्यातील देवींच्या मंदिरात शुकशुकाट
भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय
पुजाऱ्यांच्या हस्ते पारंपारिक पूजेने घटस्थापना
नागपूर जिल्ह्यातील कोराडीच्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. पण यंदाचा उत्सव कोरोनाच्या सावटाखाली होतो आहे. दरवर्षी नवरात्रौत्सव या मंदिरात 20 लाखांपेक्षा जास्त लोकं दर्शनासाठी येतात. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने उत्सव होत आहे. कुणीही भाविकांना मंदिरात दर्शनाची परवानगी नाही. त्यामुळे सर्वांसाठी ॲानलाईन पद्धतीनं दर्शनाची सोय करण्यात आली आहे.
पुण्यात चतुःशृंगी देवीच्या मंदिरात साधेपणाने नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे. धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने दर्शनासाठी ऑनलाइन व्यवस्था करण्यात आली आहे. 17 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत साधेपणाने नवरात्रौत्सव साजरा केला जाणार आहे. भाविकांसाठी देवस्थानच्या फेसबूक पेजवर आणि यूट्यूबवर दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर थेट दर्शनासाठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे. (Navratri 2020 Celebration in Maharashtra)
संबंधित बातम्या :
शिवप्रतिष्ठानची दुर्गा माता दौड रद्द, 35 वर्षांची परंपरा खंडित; कोरोना वाढल्याने घेतला निर्णय!