नक्षलवाद्यांचा हैदोस, तीन कोटींची वाहने, 10 जेसीबी पेटवले

गडचिरोली:  गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी हैदोस घातला. नक्षल्यांनी  ढिगभर वाहने पेटवून दिली. जाळण्यात आलेल्या वाहनांची किंमत जवळपास तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यामध्ये दहा जेसीबी, पाच ट्रॅक्टर आणि एक कार जळून खाक झाली. गेल्या सहा महिन्यांपासून एटापल्ली तालुक्यात वट्टेपल्ली ते गट्टेपल्ली दरम्यान रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र या रस्त्याला नक्षलवाद्यांनी वारंवार विरोध दर्शवला. याआधी रस्त्याचे […]

नक्षलवाद्यांचा हैदोस, तीन कोटींची वाहने, 10 जेसीबी पेटवले
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

गडचिरोली:  गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी हैदोस घातला. नक्षल्यांनी  ढिगभर वाहने पेटवून दिली. जाळण्यात आलेल्या वाहनांची किंमत जवळपास तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यामध्ये दहा जेसीबी, पाच ट्रॅक्टर आणि एक कार जळून खाक झाली.

गेल्या सहा महिन्यांपासून एटापल्ली तालुक्यात वट्टेपल्ली ते गट्टेपल्ली दरम्यान रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र या रस्त्याला नक्षलवाद्यांनी वारंवार विरोध दर्शवला. याआधी रस्त्याचे काम करणाऱ्या मजुरांना माओवाद्यांनी धमकावलं होते.  30 नोव्हेंबरच्या मध्यरात्री नक्षलवाद्यांनी मजुरांना बंदी बनवत, रस्त्याच्या कामासाठी आणलेली सर्व वाहने जाळून टाकली. या वाहनांची किंमत सुमारे तीन कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे.

या मार्गावरुन छत्तीसगडची सीमा सुरु होते. जर हा रस्ता तयार झाला, तर नक्षलवाद्यांना समस्या निर्माण झाल्या असत्या. तसेच याच कच्च्या रस्त्यावरुन नक्षलवादी ये-जा करतात. जर पक्का रस्ता झाला तर नक्षलवाद्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं असतं. याच कारणामुळे नक्षलवाद्यांकडून वाहनं जाळण्यात आली.

दरम्यान, आजपासून गडचिरोली जिल्ह्यात शहीद सप्ताहाला सुरुवात झाली असताना, दुसरीकडे नक्षलवाद्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे एटापलली तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.