SSR Death Case LIVE: सुशांतच्या घरात ड्रग्जच्या पार्टी रंगायच्या, दिपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडाचा संयुक्त चौकशीत दावा

अमली पदार्थ नियंत्रण विभागाचं (एनसीबी) एक पथक आज (6 सप्टेंबर) सकाळीच सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झालं आहे (NCB summons Rhea Chakraborty).

SSR Death Case LIVE: सुशांतच्या घरात ड्रग्जच्या पार्टी रंगायच्या, दिपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडाचा संयुक्त चौकशीत दावा
Follow us
| Updated on: Sep 07, 2020 | 12:26 PM

मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण विभागाचं (एनसीबी) एक पथक आज (6 सप्टेंबर) सकाळीच सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झालं (NCB summons Rhea Chakraborty). एनसीबीने तिला समन्सही बजावलं आहे. कोणत्याही क्षणी एनसीबी रिया चक्रवर्तीला ताब्यात घेऊ शकते. सुशांत सिंह प्रकरणातील ड्रग्ज अँगलवर तपास करण्यासाठी रियाची कसून चौकशी होत आहे.

LIVE Updates:

  • रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार, हा विच हंटचा प्रकार, जर एखाद्यावर प्रेम करणे गुन्हा असेल तर तिला तिच्या प्रेमाचा परिणाम भोगावा लागेल, निर्दोष असल्याने तिने सीबीआय, ईडी आणि एनसीबीकडे आता बिहार पोलिसांनी केलेल्या सर्व खटल्यांमध्ये अग्रिम जामिनासाठी कोणत्याही न्यायालयात धाव घेतली नाही : अ‍ॅड. सतीश मनेशिंदे
  • मुंबई पोलिसांच्या चार गाड्या रियाच्या घरी दाखल
  • सुशांतच्या घरात ड्रग्जच्या पार्टी रंगायच्या, दिपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडाचा संयुक्त चौकशीत मोठा दावा, पावना फार्म हाऊसवर सुद्धा ड्रग्ज पार्टी व्हायची, वॉटर स्टोनलाही ड्रग्ज पार्टी व्हायची, 7 पैकी 4 जणांची 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबीकडे रिमांड, करन, अब्बास, कैजाद यांना जामीन, इतरांची चौकशी सुरु, आज रियाचीही सखोल चौकशी होणार, भावासोबतच्या ड्रग्ज चॅट आणि पैशांच्या घेवाण देवाणीबद्दल चौकशी होणार, चौकशीअंती अटक होण्याची शक्यता

सकाळी सव्वाआठ वाजता एनसीबीचं पथक रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झालं. त्यांच्यासोबत पोलिसांचा लवाजमा देखील होता. स्वतः आयआरएस समीर वानखेडे हे देखील पथकासोबत होते. रियाला समन्स बजावलं आहे. तिला चौकसीसाठी सोबत येण्यासाठी सांगण्यात आलंय. स्वतः चौकशीसाठी येणार की आमच्यासोबत असा पर्यायही एनसीबीने रियाला दिला. त्यानंतर तिने स्वतः हजर होऊ असं सांगितलं आहे.

आता रियाला साडेदहा वाजता चौकशीसाठी एनसीबीच्या पथकासमोर हजर राहावं लागणार आहे. रियाचा घराबाहेर प्रसारमाध्यमांचीही मोठी गर्दी झाली आहे. आता एनसीबी शौविक, सॅम्युअल, दिपेश आणि रियाला समोरासमोर बसवून चौकशी करु शकते. चौकशीनंतर रियाला अटक होण्याचीही शक्यता आहे.

दुसरीकडे रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीला दोन दिवसांपूर्वीच एनसीबीने अटक केली आहे. त्याच्यासोबत सॅम्युअर मिरांडालाही अटक झाली आहे. या सर्वांची चौकशी सुरु आहे. संदीप सिंह, मितू सिंह आणि श्वेता सिंह यांचेही काल जबाब नोंदवण्यात आले आहेत. सुशांतची मैत्रीण स्मिता पारिख यांचाही जबाब घेण्यात आला आहे.

मागील 6 दिवसात एनसीबीने 9 जणांना अटक केली आहे. 9 पैकी 3 जणांना जामीन मंजूर झाला आहे. रिया आणि शोविकच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये बर्ड्स आणि डुब्ज हे ड्रग्ज तस्करीत वापरल्या जाणाऱ्या सांकेतिक शब्दांचा वापर केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच एनसीबीने यांच्याभोवतीचा फास आवळला आहे.

संबंधित बातम्या :

ड्रग्जप्रकरणी शौविक, सॅम्युअल मिरांडाला एनसीबी कोठडी, रियाच्या अटकेची दाट शक्यता

शोविक आणि सॅम्युअल मिरांडाला 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी, रियासह तिघांची एकत्रित चौकशी

SSR Death Case | भाऊ शोविकच्या अटकेनंतर रियाच्या अडचणी वाढणार? एनसीबी समन्स बजावण्याची शक्यता 

संबंधित व्हिडीओ :

NCB summons Rhea Chakraborty

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.