Pune | पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केलेल्या गैर कारभाराच्या चौकशीसाठी राष्ट्रवादीची लाचलुचपत विभागाकडे धाव ; काय आहे मागणी?
राष्ट्रवादीने एसीबीकडे तक्रार करणे हा पुणेकरांसाठी घाणेरडा काळा दिवस आहे. अशी टीका महापालिकेचे सभागृह नेता गणेश बिडकर यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांना विकृतीने ग्रासलेले आहे. आपल्या कृतीतून त्यांनी पुणेकरांच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणार आहेत.
पुणे – महापालिका निवडणुक तोंडावर येताच शहरतील राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपणाच्या फैरी झाडू लागल्या आहेत. महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या (BJP)विरोधात राष्ट्रवादीने थेट लाचलुचपत विभागाकडे तक्रार (Complaint to Bribery Department) केलीआहे. या तक्रारीत राष्ट्रवादीने महापालिकेतील सत्ताधारी भाजपने केलेल्या गैर कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP Prashant jagatap )यांनी ही तक्रार केली. पुन्हा सत्तेत येऊ की नाही याची शाश्वती नसल्याने मुद्दाम काही प्रकल्प कागदावर आणले जात आहे. 6 हजार कोटींच्या प्रकल्पांची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीने केलीये. स्थायी समितीची मुदत काही दिवसात संपणार आहे त्यासाठी एवढी घाई चाललीय का? असा सवालही जगताप यांनी केलाय.
काय आहे मागणी
पुणे महापालिकेतील विविध प्रकल्पांमध्ये टेंडर देण्यामध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. त्यामुळे पुणे शहर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्याची भेट घेत भाजपच्या विरोधात तक्रार दिली आहे. मागील 5 ते 6 महिन्यात स्थायी समितीसमोर मोठ्या बजेटचे विषय आलेत. कित्येक कोटींचे बजेट आल्याचे त्यानिया तक्रारीत सांगितले आहे.
पुणेकरांसाठी घाणेरडा काळा दिवस
राष्ट्रवादीने एसीबीकडे तक्रार करणे हा पुणेकरांसाठी घाणेरडा काळा दिवस आहे. अशी टीका महापालिकेचे सभागृह नेता गणेश बिडकर यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांना विकृतीने ग्रासलेले आहे. आपल्या कृतीतून त्यांनी पुणेकरांच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणार आहेत. महापालिका जे प्रकल्प राबवतेय ते केवळ पुणेकरांच्या भल्यासाठी येत आहेत. आगामी महापालिकेत त्यांना त्यांचा पराभव पुन्हा दिसून येत असल्याने त्यांच्याकडून अशाप्रकारची वक्तव्य, तसेच कृती केल्या जात आहेत. असेही बिडकर यांनी म्हटले आहे.
खराब केसांवर महागड्या केराटिन ट्रीटमेंट ऐवजी घरगुती उपचारही ठरेल लाखमोलाचा!
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नेमकी कोणती डाळ खायची? उत्तर इथे मिळेल!
‘चला बसुया’ असं पुरुषांपेक्षा महिलाच जास्त म्हणतायत! दारु पिणाऱ्यांची ही आकडेवारी एकदा बघाच