मग तुमचं ‘आंधळं, मुक्या, बहिऱ्या’चं सरकार का?; राष्ट्रवादीची दानवेंवर टीका
राज्यातील आघाडी सरकारला अमर, अकबर, अँथोनीचं सरकार म्हणणाऱ्या भाजप नेते रावसाहेब दानवेंवर राष्ट्रवादीने घणाघाती टीका केली आहे.
मुंबई: राज्यातील आघाडी सरकारला अमर, अकबर, अँथोनीचं सरकार म्हणणाऱ्या भाजप नेते रावसाहेब दानवेंवर राष्ट्रवादीने घणाघाती टीका केली आहे. आमच्या सरकारला तुम्ही अमर, अकबर, अँथनीचं सरकार म्हणताय ते बरोबरच आहे. कारण या तिन्ही नावात ‘सर्वधर्मसमभाव’ आहे आणि तेच मानणारं महाविकास आघाडीचं सरकार आहे, मात्र केंद्रातील तुमचं सरकार ‘आधळं, बहिरं आणि मुकं’ आहे, त्याचं काय?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. (ncp slams raosaheb danve over his statement)
भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या आरोपाला महेश तपासे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देशात वाढलेली बेरोजगारी आणि उद्ध्वस्त झालेली अर्थव्यवस्था दिसत नाही म्हणून आंधळं सरकार आणि अबला… शोषित… पीडीत… मागास लोकांवर भाजपशासित राज्यांमध्ये अन्याय, अत्याचार होतात. या शोषित लोकांचं ओरडणं ऐकू येत नाही म्हणून केंद्रातील आणि भाजपशासित राज्यातील सरकार बहिरं आहे. या घटनांवर केंद्रातील मंत्री बोलत नाही म्हणून केंद्र सरकार मुकं आहे, अशी टीका महेश तपासे यांनी केली आहे.
देशमुखांचा पलटवार
दरम्यान, दानवे यांच्या या टीकेचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही समाचार घेतला होता. “दानवेंच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथोनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण – होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथोनी,” असं देशमुख यांनी म्हटलं होतं.
दानवे काय म्हणाले होते?
तर, ‘अमर अकबर अँथोनी’ या हिंदी चित्रपटाचा संदर्भ देत महाविकास आघाडीचं हे सरकार म्हणजे अमर, अकबर, अँथोनी असून ते एकमेकांच्या पायात पाय अडकून पडतील, अशी टीका केली होती. तसंच महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार आम्ही पाडणार नाही. ते स्वत:च्याच कर्माने पडतील, असं दानवे म्हटले होते. (ncp slams raosaheb danve over his statement)
सविस्तर बातम्या:
दानवे म्हणाले, हे सरकार अमर अकबर अँथोनीचं, गृहमंत्र्यांचंही शायराना अंदाजात प्रत्युत्तर
पोलीस दलात 33 टक्के महिला पोलिसांची भरती करा, शिवसेना महिला आमदाराची गृहमंत्र्यांकडे मागणी
(ncp slams raosaheb danve over his statement)