New Promo | भाभीजी घर पर है मालिकेत ‘नेहा पेंडसेची’ एन्ट्री!

'भाभीजी घर पर है' (Bhabiji Ghar Par Hain) या मालिकेच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून चाहते अनिता भाभीच्या प्रतीक्षेत होते.

New Promo | भाभीजी घर पर है मालिकेत 'नेहा पेंडसेची' एन्ट्री!
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 1:08 PM

मुंबई : ‘भाभीजी घर पर है’ (Bhabiji Ghar Par Hain) या मालिकेच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून चाहते अनिता भाभीच्या प्रतीक्षेत होते. आता चाहत्यांची ही प्रतिक्षा संपली असून नेहा पेंडसे (Neha Pendse) अनिता भाभीची भूमिका साकारणार आहे. सौम्या टंडन गेल्यापासून अनिता भाभीची भूमिका चाहते मिस करत होते. नुकताच भाभीजी घर पर है मालिकेचा प्रोमोसमोर आला आहे. ज्यामध्ये नेहाची जबरदस्त एन्ट्री दाखवली आहे. अनिताने म्हणजेच नेहाने लाल साडीमध्ये एन्ट्री घेतली आहे, अनिता भाभीच्या एन्ट्रीमुळे तिवारीजी खूप खुश झाले आहेत. (Neha Pendse’s entry in Bhabiji Ghar Par Hain series)

View this post on Instagram

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

नेहाने देखील हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. नेहाची ही एन्ट्री चाहत्यांना देखील खूप आवडली आहे. इतकेच नाही तर चाहऱ्यांना नेहाला लवकरात लवकर अनिता भाभीच्या भूमिकेत पाहायचे आहे, त्यामुळे नेहाचा एपिसोड कधी प्रसारित होणार आहे असे प्रश्न चाहत्यांकडून विचारले जात आहेत. चाहते आता भाभीजी घर पर है च्या नवीन एपिसोडची आतुरतेने वाट पाहात आहेत.

नेहाच्या या एन्ट्रीमुळे रोहिताश खूश आहे. नेहाविषयी रोहिताश म्हणाला की, ‘नेहाची आधीच चांगली फॅन फॉलोइंग आहे आणि अनिता भाभीच्या भूमिकेसाठी नेहा अगदी परिपूर्ण आहे. रोहिताश पुढे म्हणाले की, सौम्याबरोबर मी पाच वर्षे काम केले आहे. दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. जेव्हा रोहिताशला नेहाबरोबरच्या केमिस्ट्रीबद्दल विचारले गेले तेव्हा ते म्हणाले की, नेहाबरोबर केमिस्ट्री तयार करण्यास थोडा वेळ लागेल.

सौम्यासोबतची बॉन्डिंग हळूहळू सुधारली होती. त्यामुळे नेहाबरोबर काही दिवस काम केल्यावर चांगली बॉन्डिंग होईल. या मालिकेत मनमोहन तिवारीची भूमिका साकारणारा रोहिताश आहे. या मालिकेच्या कथेमध्ये दोन जोडपे असतात त्यामध्ये दोघेही एक-दुसऱ्याच्या पत्नीवर प्रेम करतात आणि नेमके त्यांच्या आयुष्यात काय घडते हे दाखवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या : 

विशाल ददलानींना इतिहास माहित नाही? ट्विटरवर सालटं का काढतायत लोक?

The Kapil Sharma Show | चाहत्यांसाठी मोठा धक्का, कपिल शर्माचा शो बंद होणार?

(Neha Pendse’s entry in Bhabiji Ghar Par Hain series)

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.