पुण्यातील प्राध्यापक, शिक्षकांचा एल्गार; पदवीधरच्या निवडणुकीसंदर्भात घेतला मोठा निर्णय
पुण्यातील नेट, सेट, पीएचडी धारकांनी या मतदानाविरोधात एल्गार पुकारला आहे. निवडणुकीत सर्व प्राध्यापक कोणताही पर्याय न निवडता थेट नोटाला मतदान करणार असल्याचं नेट, सेट, पीएचडीधारक संघर्ष समितीने जाहीर केलं आहे.

पुणे : राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारी अर्ज भरायलाही सुरुवात झाली आहे. सर्व पक्ष आपापल्या उमेदवाराला निवडणून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच पुण्यातील नेट, सेट, पीएचडी धारकांनी मतदानाविरोधात एल्गार पुकारला आहे. या निवडणुकीत सर्व प्राध्यापक कोणताही पर्याय न निवडता थेट नोटाला मतदान करणार असल्याचं नेट, सेट, पीएचडीधारक संघर्ष समितीने जाहीर केलं आहे. (Net Set PhD holder announced that all the professors will vote for NOTA in graduate constituency election)
मागील दहा वर्षांत पदवीधर आणि प्राध्यापकांचे प्रश्न सोडवण्यात पदवीधर आणि शिक्षकांचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत, असे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदा कोणताही पर्याय न निवडता आम्ही नोटा हा पर्याय स्वीकारणार असल्याचं नेट, सेट पीएचडी धारक संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश देवढे यांनी सांगितलं. तसेच, या भूमिकेबद्दलचं पत्र थेट निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. यावेळी मतदारसंघात नोटाला उच्चांकी मतदान झालं तर निवडणूकचं रद्द करण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवडणूक आयुक्तांनी केली आहे.
नेट, सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या या भूमिकेमुळे पुण्यातील पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होणार आहे. पुण्यात मनसेकडून रुपाली पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. तर अभिजीत बिचुकले यांनीदेखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाकडून राज्यात एकूण 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर 2 जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या पाच जागांसाठी पुढील महिन्यात (डिसेंबर) 1 तारखेला मतदान होईल तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे.
संबंधित बातम्या :
हक्काच्या पदवीधर मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण? पुन्हा अनिल सोले की महापौर संदीप जोशींना संधी?
राज्यातही निवडणुकांचा श्रीगणेशा; पदवीधर मतादरसंघांची निवडणूक जाहीर, 1 डिसेंबरला मतदान
हक्काच्या पदवीधर मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण? पुन्हा अनिल सोले की महापौर संदीप जोशींना संधी?
(Net Set PhD holder announced that all the professors will vote for NOTA in graduate constituency election)