नवीन PAN 2.0 कसे काढायचे? घरबसल्या करा अर्ज, प्रोसेस जाणून घ्या

नवीन पॅन 2.0 काढायचे आहे का? मग त्याची प्रोसेस काय आहे? पॅन 2.0 कसे बनवतात? या सर्व प्रश्नांची उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. पॅन 2.0 उपक्रम हा एक ई-गव्हर्नन्स प्रकल्प आहे, ज्याचा उद्देश करदात्यांच्या नोंदणीकृत सेवांमध्ये बदल करणे आहे.

नवीन PAN 2.0 कसे काढायचे? घरबसल्या करा अर्ज, प्रोसेस जाणून घ्या
new pancard
Follow us
| Updated on: Dec 15, 2024 | 4:08 PM

तुम्हाला नवीन पॅन 2.0 काढायचे आहे का? मग ही बातमी वाचा. तुमचे अर्धे काम इथेच पूर्ण होईल. तुम्हाला काहीही करायचे नाही. ही माहिती संपूर्ण वाचली की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील आणि तुम्ही अगदी सहज पॅन 2.0 काढू शकतात.

केंद्र सरकारने पॅन सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्याची कार्यक्षमता सुधारण्यासाठी पॅन 2.0 प्रकल्प सुरू केला आहे. नवीन पॅन अंतर्गत QR कोड जोडण्यात आला आहे, ज्याअंतर्गत तुम्ही स्कॅन करून सर्व माहिती मिळवू शकता.

QR कोड असलेल्या सिस्टीममुळे तुम्हाला अनेक महत्त्वाची कामे करणे सोपे जाईल. पॅन 2.0 प्रकल्पांतर्गत सुमारे 1435 कोटी रुपये खर्च होण्याची सरकारची अपेक्षा आहे.

हे सुद्धा वाचा

नवीन पॅन कार्ड सादर करण्याचे कारण म्हणजे भारताला डिजिटलदृष्ट्या सक्षम करणे आणि आयकर विभागाचे कामकाज सुरळीत करण्यास मदत करणे. पॅन 2.0 उपक्रम हा एक ई-गव्हर्नन्स प्रकल्प आहे ज्याचा उद्देश करदात्यांच्या नोंदणीकृत सेवांमध्ये बदल करणे आहे.

पॅन (स्थायी खाते क्रमांक) आणि टॅन (कर वजावट आणि संकलन खाते क्रमांक) प्रणाली नोंदणीकृत प्लॅटफॉर्ममध्ये एकत्रित करून, डेटा सुरक्षा सुनिश्चित करताना प्रक्रिया सुलभ करणे हे प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे.

पॅन 2.0 संबंधित काही महत्वाचे प्रश्न

प्रश्न: जुने पॅन अवैध ठरेल का?

उत्तर: नाही, जुन्या पॅन कार्डवर याचा कोणताही परिणाम होणार नाही, पण जुन्या युजर्सची इच्छा असेल तर ते या पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतात. ही पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया आहे. जे अर्ज केल्यानंतर लगेचच आपल्या नोंदणीकृत ई-मेलवर पाठवले जाते.

प्रश्न: नवीन पॅनकार्ड कुठून मिळेल?

उत्तर: तुम्हालाही QR कोडसह पॅन कार्ड बनवायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. हे पॅन तुमच्या मेलवर पाठवले जाईल किंवा तुम्ही एनएसडीएलच्या वेबसाइटवरूनही डाऊनलोड करू शकता.

प्रश्न: किती शुल्क आकारले जाईल?

उत्तर: ही सेवा पॅन जारी केल्यापासून 30 दिवसांच्या आत तीन विनंत्यांसाठी विनामूल्य आहे. त्यानंतर च्या विनंतीवर जीएसटीसह 8.26 रुपये शुल्क आकारले जाईल. मात्र फिजिकल पॅन कार्ड हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला 50 रुपये फी भरावी लागणार आहे.

प्रश्न – अर्ज कसा करावा?

उत्तर: पॅन 2.0 साठी अर्ज प्रक्रिया युजर फ्रेंडली आणि पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे.

एनएसडीएलच्या माध्यमातून ई-पॅनसाठी www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html भेट द्या.

आता तुमचे पॅन, आधार कार्डतपशील (व्यक्तींसाठी) आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.

आपले तपशील तपासा आणि वन टाइम पासवर्ड (OTP) मिळविण्यासाठी पुढे जा. चालू ठेवण्यासाठी 10 मिनिटांच्या आत OTP टाका..

ही सेवा पॅन जारी केल्यापासून 30 दिवसांच्या आत तीन विनंत्यांसाठी विनामूल्य आहे. त्यानंतर च्या विनंतीवर जीएसटीसह 8.26 रुपये शुल्क आकारले जाईल.

यशस्वी पेमेंट केल्यानंतर 30 मिनिटांच्या आत तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर ई-पॅन पाठवला जाईल. फिजिकल पॅनसाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागेल.

जर तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर पॅन कार्ड मिळाले नसेल तर कृपया पेमेंटडिटेल्ससह tininfo@proteantech.in संपर्क साधावा.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.