AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडलं, निरंजन डावखरेंची अनिल परब यांच्यावर टीका

ठाणे महापालिकेच्या गलथान कारभारावर प्रश्न उपस्थितीत करणारा एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला (Niranjan Davkhare Criticizes Anil Parab) आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडलं, निरंजन डावखरेंची अनिल परब यांच्यावर टीका
Follow us
| Updated on: Jun 20, 2020 | 3:37 PM

नवी मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महाराष्ट्रात विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना पाहायला मिळत आहे. केंद्राकडून योग्य ती मदत मिळत नसल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. तर विरोधीपक्षाकडून सरकार कसं अपयशी ठरलं? हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात जोरदार ट्विटर वॉर सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच विधान परिषदेचे  भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी सुद्धा उडी घेतली आहे. (Niranjan Davkhare Criticizes Anil Parab)

“मुंबई-ठाण्यात अडकलेल्या हजारो मजुरांना मध्यप्रदेश सीमेपर्यंत सोडणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने वार्‍यावर सोडले. मुंबई- ठाणे विभागात कार्यरत एसटी कर्मचारी मे महिन्याच्या पगाराची अजून प्रतिक्षेत आहे,” असं ट्विट करत आमदार निरंजन डावखरे यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनाही टॅग करत एसटी कर्मचाऱ्यांचा पगाराचा प्रश्न उपस्थित केला आहे.

तर दुसरीकडे  कोव्हिड -19 प्रतिबंधासाठी कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीत निवड झालेल्या पात्र बेरोजगार तरुणांकडून एक महिन्याचा पगार डिपॉझिट घेण्याची अट ठाणे महापालिकेने टाकली होती. यावरही निरंजन डावखरे यांनी अनेक सवाल उपस्थित केले होते.

“वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अशाप्रकारची अट ठेवणारे ठाणे महापालिकेचे अधिकारी आहेत की ‘वेठबिगार’वाले सावकार,” असा सवाल करत टीकास्त्र सोडलं होतं. त्यानतंर आता ठाणे महापालिकेच्या गलथान कारभारावर प्रश्न उपस्थितीत करणारा एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीने नजीब मुल्ला यांना उमेदवारी जाहीर केली होती. दरम्यान, पदवीधरचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती.

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर भाजपाचे निरंजन डावखरे यांनी बाजी मारली. डावखरे यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय मोरे यांचा 2988 मतांनी पराभव केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करून डावखरेंनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपात प्रवेश करतेवेळीच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डावखरेंच्या उमेदवारीची घोषणा केली होती. (Niranjan Davkhare Criticizes Anil Parab)

संबंधित बातम्या : 

….तर भाजपने उद्धव ठाकरेंना पाठिंबा देऊन सरकार स्थापन करावं : सुब्रमण्यम स्वामी

Shivsena Foundation Day | भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही करणार, उद्धव ठाकरे यांचा निर्धार