नितीश कुमारांवर भरसभेत कांदाफेक, बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर रोष
प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु असताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना प्रचारसभेत लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे (Nitish Kumar face protest of person at Madhuban rally).
पाटणा : बिहारमध्ये विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्षाचे मातब्बर नेते प्रचारात सामील होऊन बिहारच्या जनतेला विकासाचे आणि रोजगाराचे आश्वासन देत आहेत. प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु असताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना प्रचारसभेत लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे (Nitish Kumar face protest of person at Madhuban rally).
नितीश कुमार आज (3 नोव्हेंबर) बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील हरलाथी विधानसभा क्षेत्रात प्रचारासाठी गेले होते. यावेळी भाषण करत असताना एका व्यक्तीने त्यांच्या अंगावर कांदे फेकले. यावेळी त्या व्यक्तीने भर प्रचारसभेत नितीश कुमार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली (Nitish Kumar face protest of person at Madhuban rally).
“बिहारमध्ये बिंधास्तपणे मद्यविक्री होत आहे. तस्करी केली जात आहे. पण तुम्ही काहीच करु शकत नाही”, अशाप्रकारची घोषणाबाजी नितीश कुमार यांच्यावर कांदा फेकणाऱ्या व्यक्तीने केली. यावेळी नितीश कुमार यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, “फेकू द्या, जेवढं फेकायचं आहे तेवढं फेकू द्या”, असं नितीश कुमार म्हणाले. त्यानंतर त्यांनी आपलं भाषण पुन्हा सुरु ठेवलं.
नितीश कुमार यांच्यासोबत अशाप्रकारची घटना पहिल्यांदा घडलेली नाही. त्यांना याआधीदेखील प्रचारादरम्यान विरोधाचा सामना करावा लागला आहे. काही लोकांनी अनेकदा भर सभेत नितीश कुमार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आहे. काही ठिकाणी तर नितीश यांना काळे झेंड दाखवण्यात आले आहेत.
दरम्यान, हरलाथीत बोलताना नितीश कुमार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “सरकार आल्यानंतर रोजगार निर्माण होईल. कुणालाही नोकरीसाठी बाहेर जावं लागणार नाही. जे आज नोकरीची गोष्ट करत आहेत, ते जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांनी किती लोकांना रोजगार दिला?”, असा सवाल नितीश कुमार यांनी केला.
#Correction: Onions pelted during Chief Minister Nitish Kumar’s election rally in Madhubani’s Harlakhi.#BiharPolls pic.twitter.com/0NwXZ3WIfm
— ANI (@ANI) November 3, 2020
संबंधित बातम्या:
लोकांना नितीश कुमार नको, बिहारचे पुढचे मुख्यमंत्री तेजस्वी यादवच : संजय निरुपम