AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील लॉकडाऊन हटवणार, मात्र काही निर्बंध राहणार, विकेंडच्या बंधनावरही चर्चा

दोन दिवस लॉकडाऊनबाबत अजून निर्णय घ्यायचा आहे, असं जिल्हा परिषद सीईओ सौरभ राव यांनी सांगितलं. (No decision about two day lockdown in Pune)

पुण्यातील लॉकडाऊन हटवणार, मात्र काही निर्बंध राहणार, विकेंडच्या बंधनावरही चर्चा
Follow us
| Updated on: Jul 23, 2020 | 6:27 PM

पुणे : पुण्यातील दुसऱ्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र लॉकडाऊन संपत असला तरी गर्दी नियंत्रणासाठी विशेषतः शनिवार-रविवारबाबत प्रतिबंध लावण्याचा विचार प्रशासनाचा आहे. मात्र या दोन दिवस लॉकडाऊनबाबत अजून निर्णय घ्यायचा आहे, असं विभागीय आयुक्तालयाचे विशेष कार्यअधिकारी सौरभ राव यांनी सांगितलं. (No decision about two day lockdown in Pune)

तर विकेंन्डला प्रतिबंध लावायचे की नाही, यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेणार, आम्हाला अधिकार आहे पण वरिष्ठांना माहिती द्यावी लागते, लॉकडाऊन राहणार नाही मात्र प्रतिबंध कसे राहतील, यावर चर्चा सुरु आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.  

लॉकडाऊन आज संपत असल्याने पुणे प्रशासनातील जिल्हा परिषद सीईओ सौरभ राव, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पोलीस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम, आयुक्त (पुणे महानगर पालिका) श्री. विक्रमकुमार यांनी गुगल मीटद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. (No decision about two day lockdown in Pune)

राज्य सरकारचे निर्देश 31 जुलैपर्यंत कायम आहेत. त्या निर्देशांनुसार उद्यापासून परिस्थिती कायम राहील. त्यामुळे लॉकडाऊनपूर्वी असलेले P1 P2 चे नियम दुकानांना लागू राहतील, कोणताही वेगळा आदेश काढला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेतील मुद्दे

सौरभ राव – दोन दिवस लॉक डाऊन याबाबत अजून निर्णय घ्यायचा आहे

सौरभ राव- आम्ही नवीन कोणताही वेगळा आदेश काढला नाही, जुना सरकारचा निर्देश कायम राहील,

सौरभ राव – पुण्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 59.6,  मृत्यू दर 2.51 टक्के आहे. चार आठवडे या कालावधीत देशात सर्वाधिक टेस्ट केली, सौरभ राव- चार वीक मृत्यू 2.6 टक्के आहे. Icmr guide line नुसार जिल्ह्याचा मृत्यू दर 2.35 टक्के आहे, हा दर 1 टक्के पेक्षा कमी करायचा आहे,

सौरभ राव- लॉक डाऊन काळात बेड वाढवण्याचा प्रयत्न झाला, 4 हजार पेक्षा ऑक्सिजनशिवायचे बेड उपलब्ध केले, आमची एक टीम खासगी रुग्णालयांमध्ये भेट देऊन पाहणी करत आहेत,

सौरभ राव- आज सर्व डॉक्टरांची बैठक झाली आहे, ते अजून किती बेड वाढवायचे हे सांगणार आहे, 305 व्हेंटिलेटर बेड आहे, वीस टक्के रुग्ण लोक इतर जिल्ह्यातील आले आहेत, मुंबई प्रमाण जंबो फॅसिलिटी उपलब्ध करणार आहे, दोन समित्या स्थापन केली आहे, 25-20 ऑगस्ट पर्यंत जंबो फॅसिलिटी उपलब्ध होणार आहे

सौरभ राव- रुग्ण वाढले असल्याने ताण येतो, याची जाणीव आहे, लॉक डाऊन फायदा झाला

सौरभ राव- डॅशबोर्ड रोज माहिती अपडेट करण्याची डॉक्टर यांना सूचना केली

जिल्हाधिकारी- अॅक्टिव्ह रुग्ण संख्या जास्त दिसत आहे, डिस्चार्ज झाली तरी त्याचं अपडेट झाले नाही, डेटा एन्ट्री रोज करण्याची सूचना केली, ते लवकरच क्लिअर होईल,

जिल्हाधिकारी – नवल किशोर राम- व्यापाऱ्यांची, नोकर, पथारी, भाजी यांची टेस्ट करणार आहे

सौरभ राव- आम्ही नवीन कोणताही वेगळा आदेश काढला नाही, जुना सरकारचा निर्देश कायम राहील,

सौरभ राव- वेगवेगळ्या खासगी संस्था आम्हला कुशल मनुष्यबळ उपलब्ध करणार आहेत, रुग्णालयातील काही वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर यांची निवास व्यवस्था करणार आहे

सौरभ राव- अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात सध्या – पुणे मनपा क्षेत्र – 14 हजार 700, तर  पीसीएमसी 5053,  ग्रामीण भागात 2988 सध्या active रुग्ण,

जिल्हाधिकारी – नॉन कोविढ रुग्ण संदर्भात आढावा घेतला आहे, 80 टक्के covid आणि नॉन covid राखीव आहे, दोन्ही रुग्णांना सेवा देण्याचा प्रयत्न आहे, मुंबईकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, टेस्टिंग, tracing, भर आहे. पुण्याचा वेगळा पॅटर्न देशात सर्वात जास्त टेस्टिंग करतो

राव- व्हेंटिलेटर असताना कोणाला मिळाला नाही असं झालंच नाही, एखादा रुग्ण किमान ऑक्सिजन बेड दाखल करुन घेतली, नंतर जिथं ICU किंवा सुविधा उपलब्ध होईल तिथं रुग्णाला दाखल करण्यात येईल, उपचार करणे ही प्राधान्य आहे

राव – covid सेंटर वर सुरक्षा प्रश्न निर्माण झाला होता, अशी तक्रार आल्यावर त्वरीत कारवाई होणार आहे

पालिका आयुक्त, विक्रम कुमार – नवीन प्रतिबंधित क्षेत्र आज रात्री जाहीर करणार

लॉकडाऊन मुख्य उद्देश टेस्टिंग खूप वाढवली, विकमध्ये रुग्ण बाहेर काढले, कॉन्टॅक्ट ट्रिसिंग केलं, दहा दिवसात बेड वाढवले आहे

जिल्हाधिकारी – आमची रुग्ण माहिती खरी आहे, डेटा एन्ट्री चुकत आहे

जिल्हाधिकारी –विकएन्डला प्रतिबंध लावायचे की नाही, यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेणार, आम्हाला अधिकार आहे पण वरिष्ठांना माहिती द्यावी लागते, लॉकडाऊन राहणार नाही मात्र प्रतिबंध कसे राहतील, यावर चर्चा सुरु आहे, 

जिल्हाधिकारी -गर्दी टाळण्यासाठी काय प्रतिबंध घालण्यात येईल, यावर चर्चा सुरु आहे

(No decision about two day lockdown in Pune)

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....