AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणताही शत्रू शुद्र नसतो, पंकजांचे नाशिकमध्ये सूचक वक्तव्य, त्यांच्या मनात सल आहे तरी काय?

सध्या राज्यात सुरू असलेल्या अनेक घडामोडींवरही पकंजा मुंडे यांनी आपल्या सूचक शब्दांमधून भाष्य केले. त्या म्हणाल्या, राजकारणात उदाहरण सेट करण्यासाठी चांगले लोक यावेत. अनिल देशमुख यांची अटक हा प्रक्रियेचा भाग आहे. ती सुरू आहे. मी जज नाही. त्याच्यावर जे बोलत आहेत, ते इतके बोलत आहेत की, मला बोलण्याची आवश्यकता नाही.

कोणताही शत्रू शुद्र नसतो, पंकजांचे नाशिकमध्ये सूचक वक्तव्य, त्यांच्या मनात सल आहे तरी काय?
पंकजा मुंडे, भाजप नेत्या.
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 2:09 PM

नाशिकः कोणताही शत्रू शुद्र नसतो. असा एकही व्यक्ती सापडणार नाही, की ज्याच्या मनात सल नाही. मात्र, हे सगळं बाजूला ठेवून काम करा, असं आवाहन पकंजा मुंडे यांनी मंगळवारी नाशिकमध्ये केले. मात्र, त्यांच्या मनात नेमकी कशाची सल आहे, याची चर्चा यामुळे रंगली.

पंकजा म्हणाल्या, कोणताही शत्रू शुद्र नसतो. असा एकही व्यक्ती नाही, ज्याच्या मनात सल नाही. मात्र, हे सगळं बाजूला ठेवून परिवार म्हणून एकत्र काम करा. भाजप कार्यकर्त्यांच्या धमण्यांमधून संस्कार वाहतो. आमचा उमेदवार आघाडीवर असल्याचं जयकुमार भाऊंनी मला आता सांगितलं. मी मध्यप्रदेशची आहे ना, आता मी बाहेरची आहे. खरं सांगू, पण मला वाटलंच नाही मी बाहेर आहे. अस वाटलं मी माहेरीच आहे. राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होईल असं कोणाला वाटलं नव्हतं, पण ते आता होतंय, हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत. सध्या राज्यात सुरू असलेल्या अनेक घडामोडींवरही पकंजा मुंडे यांनी आपल्या सूचक शब्दांमधून भाष्य केले. त्या म्हणाल्या, राजकारणात उदाहरण सेट करण्यासाठी चांगले लोक यावेत. अनिल देशमुख यांची अटक हा प्रक्रियेचा भाग आहे. ती सुरू आहे. मी जज नाही. त्याच्यावर जे बोलत आहेत, ते इतके बोलत आहेत की, मला बोलण्याची आवश्यकता नाही. मी पेन घेऊन बसलेले नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. मंत्री मंत्री झाल्यावर मी अनेक योजना नाशिकमध्ये राबवल्या. आज मी राष्ट्रीय सचिव म्हणून इथे आले आहे. येणाऱ्या काळात सार्वजनिक वाहतूक वाढवली पाहिजे. अशा बस उपलब्ध झाल्या, तर वाहतूक कोडींचा प्रश्न कमी होईल, असं म्हणत त्यांनी शहर बसचे कौतुक केले.

कोणताही शत्रू शुद्र नसतो. असा एकही व्यक्ती नाही, ज्याच्या मनात सल नाही. मात्र, हे सगळं बाजूला ठेवून परिवार म्हणून एकत्र काम करा. राजकारणात उदाहरण सेट करण्यासाठी चांगले लोक यावेत. अनिल देशमुख यांची अटक हा प्रक्रियेचा भाग आहे. ती सुरू आहे. मी जज नाही. त्याच्यावर जे बोलत आहेत, ते इतके बोलत आहेत की, मला बोलण्याची आवश्यकता नाही. – पंकजा मुंडे, भाजप नेत्या (No enemy is Shudra, says Pankaja Munde in Nashik)

इतर बातम्याः

Nashik weather: उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका दिवाळीनंतरच; दक्षिण महाराष्ट्रात मात्र ऐन दिवाळीत धारानृत्य!

सोमय्यांना आधी कळतं अन् नंतर कारवाई होते, देशमुख अटकेवर भुजबळांची प्रतिक्रिया; देशभर असे प्रकार सुरू असल्याचा दावा

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....