तीन महिन्यांच्या बाळाच्या आईला कोरोना, उपचार करणाऱ्या नर्स आईच्या भूमिकेत
तीन महिन्यांच्या मुलीच्या आईला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ही आई आपल्या बाळाला दूध पाजू शकत नाही (Nurse taking care of child).
रायपूर : कोरोनाविरोधाच्या लढाईत डॉक्टर आणि नर्स (Nurse taking care of child) प्रचंड मेहनत घेत आहेत. आरोग्य कर्मचारी जीव ओतून काम करत आहेत. अशातच एक भावनिक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमध्ये तीन महिन्यांच्या मुलीच्या आईला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ही आई आपल्या बाळाला दूध पाजू शकत नाही. मात्र, अशावेळी रायपूरच्या एम्स रुग्णालयाच्या नर्स पुढे आल्या आहेत. या नर्स आईची भूमिका निभावत बाळाला दूध पाजत आहेत (Nurse taking care of child).
छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील कटघोरा हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. या भागात अनेक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. याच भागातील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी दोन महिला आहेत. या महिलांना दोन लहान मुली आहेत.
यापैकी एक मुलगी अवघ्या 3 महिन्यांची आहे तर दुसरी 22 महिन्यांची आहे. कोरोनाचं संक्रमण झाल्यामुळे या मुलींच्या आई त्यांना दूध पाजू शकत नाहीत. अशावेळी रुग्णालयाच्या नर्स पुढे आल्या आहेत. ते या मुलींचं संगोपन करत आहेत आणि दुधही पाजत आहेत.
#WATCH Chhattisgarh: The nursing staff at AIIMS (All India Institute Of Medical Sciences) Raipur taking care of a 3-month-old daughter of a woman who has tested positive for COVID-19. (Video source: AIIMS Raipur) pic.twitter.com/d4K4LlVdpE
— ANI (@ANI) April 15, 2020
या मुलींच्या आईवर रायपूरच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहे. या दोघी मुलींची तपासणी करण्यात आली असून त्यांचा पहिला रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर कुटुंबातील सर्व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
मुलींचे वडील कामानिमित्त दुसऱ्या राज्यात गेले होते. लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकले आहेत. अशा कठीण परिस्थितीत एम्स रुग्णालय प्रशासन पुढे आलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांसोबतच या दोन लहान मुलींचीदेखील काळजी घेतली जात आहे. रुग्णालयाच्या नर्स पीपीई सूट परिधान करुन मुलींना दूध पाजत आहेत.
देशावर कोरोनाचं मोठं संकंट आलं आहे. मात्र, अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचारी आणि नर्स मौल्यवान भूमिका निभावत आहेत. आपलं घरदार, कुटुंब सोडून हे कर्मचारी 24 तास झटत आहेत. .कोरोनाविरोधाच्या लढाईत डॉक्टर आणि नर्स प्रचंड मेहनत घेत आहेत. आरोग्य कर्मचारी जीव ओतून काम करत आहेत. अशा परिस्थितीत रायपूरच्या एम्स रुग्णालयातील नर्स यांच्याकडून तीन महिन्यांच्या बाळाची काळजी घेतली जात असल्याचं पाहून अनेक जण भावनिक झाले आहेत. या नर्सेसकडून बाळाला दूध पाजत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संबंधित बातम्या :
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आम्हालाही द्या, पाकिस्तानची भारतापुढे याचना
महाराष्ट्रात एकही बालक पोषण आहारापासून वंचित राहणार नाही : यशोमती ठाकूर
Maharashtra corona update | रुग्णांची संख्या 3 हजारांजवळ, कुठे किती कोरोना रुग्ण?