“OBC आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचा जीआर काढा”
पुणे : इतर मागास वर्गाच्या (ओबीसी) आरक्षणाला कोणत्याही परिस्तितीत धक्का लागणार नाही, असा जीआर राज्य सरकारने काढावा, अशी मागणी ओबीसी जागरण परिषदेत करण्यात आली. तसेच, मराठा समाजाला मागास ठरवणाऱ्या मागासवर्ग आयोगावरही ओबीसी जागरण परिषदेतून टीका करण्यात आली. मराठा समाज मागास कसा, असा प्रश्नही या परिषदेतून उपस्थित करण्यात आला. पुण्यातील सावित्रीबाई फुले स्मारकात आज पहिल्या ओबीसी […]
पुणे : इतर मागास वर्गाच्या (ओबीसी) आरक्षणाला कोणत्याही परिस्तितीत धक्का लागणार नाही, असा जीआर राज्य सरकारने काढावा, अशी मागणी ओबीसी जागरण परिषदेत करण्यात आली. तसेच, मराठा समाजाला मागास ठरवणाऱ्या मागासवर्ग आयोगावरही ओबीसी जागरण परिषदेतून टीका करण्यात आली. मराठा समाज मागास कसा, असा प्रश्नही या परिषदेतून उपस्थित करण्यात आला.
पुण्यातील सावित्रीबाई फुले स्मारकात आज पहिल्या ओबीसी जागरण परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘आरक्षण : काल-आज-उद्या’ याविषयावर चर्चा होणार झाली.
आमदार प्रकाश शेडगे यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन करण्यात आले. हरिभाऊ राठोड, लक्ष्मण माने, शंकरराव लिंगे, सचिन माळी, श्रावण देवरे यांची या परिषदेला प्रमुख उपस्थिती होती. या परिषदेला राज्यभरातून ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
ओबीसी जागरण परिषदेच्याप्रमुख मागण्या :
- व्ही. पी. सिंग यांना ‘भारतरत्न’ द्या
- पुणे विद्यापीठाची नामदुरुस्ती करावी
- पुणे विद्यापीठाच्या लोगोमधून ‘शनिवारवाडा’ काढून त्यामध्ये ‘भिडे वाडा’ यावा
- ओबीसीच्या आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागणार नाही, असा जीआर सरकारने काढावा
- भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे
मराठा आरक्षण
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सातत्याने लाखोंचे मोर्चे काढल्यानंतर अखेर मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे. एसईबीसी असा नवा प्रवर्ग तयार करुन, त्याअंतर्गत 16 टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्यात आले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाज मागास असल्याचे अहवालातून सांगितल्यानंतर, सरकारने विधेयक तयार केला आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करुन घेतला. त्यानंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीने विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले असून, आता मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात आले आहे.