Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितीन गडकरींच्या घरासमोर ओबीसींचा थाळीनाद; आज राज्यभर निदर्शने

मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही. पण ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, असं सांगतानाच आमच्या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.

नितीन गडकरींच्या घरासमोर ओबीसींचा थाळीनाद; आज राज्यभर निदर्शने
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 11:40 AM

नागपूर: मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी ओबीसी संघटना आक्रमक झाल्या असून या संघटनांनी आज केंद्रीय परिवहन मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांच्या घरासमोर थाळीनाद आंदोलन केलं. ओबीसींचं हे आंदोलन आज दिवसभर सुरू राहणार असून मंत्री, खासदार आणि आमदारांच्या घरांसमोर आज निदर्शने करण्यात येणार आहेत. (obc community agitation at nitin gadkari house)

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. आज सकाळी ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी गडकरी यांच्या घरासमोर थाळीनाद आंदोलन करत विविध मागण्या मांडल्या. गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसींची जनगणना झाली नाही. ही जनगणना करा. ओबीसींसाठीच्या ‘महाज्योती’ला सरकारने निधी द्यावा या आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही. पण ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, असं सांगतानाच आमच्या मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा तायवाडे यांनी दिला आहे.

… तर सामाजिक सलोखा बिघडेल

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर काही मराठा संघटनांनी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्याला आमचा विरोध आहे. याबाबत आता सरकारनेच स्वत: पावले उचलावीत अन्यथा महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा बिघडेल, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिला आहे. मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आज राज्यभर तहसील कार्यालयासमोर आरक्षण बचाव आंदोलन करण्यात येत असल्याचंही शेंडगे यांनी सांगितलं.

ओबीसींच्या भीतीला सरकार जबाबदार

आमचं सरकार असताना आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. उच्च न्यायालयात आम्ही हे आरक्षण टिकवून दाखवलं होतं. मात्र, आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवता आलं नाही. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण दिलं जाईल ही ओबीसी समजाला भीती वाटत असून त्याला राज्य सरकारच जबाबदार आहे, अशी टीका भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी केली. (obc community agitation at nitin gadkari house)

संबंधित बातम्या:

Live : ओबीसी नेत्यांची मराठा बैठकीला हजेरी, संभाजीराजेंच्या उपस्थितीत आरक्षणाला पाठिंबा

महाराष्ट्रात 52 टक्के ओबीसी समाज, मात्र आजही अत्यंत गरीब असून अडगळीत पडलाय : विजय वडेट्टीवार

मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करेल, संभाजीराजेंना ओबीसी नेत्यांचा शब्द

(obc community agitation at nitin gadkari house)

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.