OBC RESERVATION : ओबीसी समाज पुन्हा रस्त्यावर उतरला, आरक्षणासाठी रत्नागिरीत भव्य मोर्चा

| Updated on: Nov 26, 2021 | 1:12 PM

ओबीसी आरक्षण आणि जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी समाज पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. विविध मागण्यांसाठी ओबीसींनी रत्नागिरीत भव्य मोर्चा काढला होता. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचं सासू सुनेचं भांडण कधी संपणार आणि आरक्षणाचे प्रश्न कधी मार्गी लागणार असा सवाल ओबीसी समाजाकडून विचारण्यात येतोय.

OBC RESERVATION : ओबीसी समाज पुन्हा रस्त्यावर उतरला, आरक्षणासाठी रत्नागिरीत भव्य मोर्चा
ओबीसी संघटनेचं आंदोलन
Follow us on

रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाची मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. ओबीसी आरक्षण आणि जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी समाज पुन्हा रस्त्यावर उतरला आहे. विविध मागण्यांसाठी ओबीसींनी रत्नागिरीत भव्य मोर्चा काढला होता. त्यात मोठ्या संख्येनं ओबीसी समाज सामील झाल्याचं पाहायला मिळालं.

ओबीसी आरक्षणाचा तिढा कधी सुटणार ?

न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यापासून अनेकवेळा ओबीसी समाज रत्यावर उतरला आहे. राज्यातील काही नेत्यांनी जोपर्यंत ओबीसीआरक्षणाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये अशी मागणी केली. मात्र निवडणूक आयोगानं ही मागणी मान्य  केली नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटला नसताना काही ठिकाणी निवडणुका पार पडल्या त्याचा निश्चितच फटका ओबीसी समाजाला बसला आहे. त्यामुळे ओबीसी समाज पुन्हा आक्रमक झाला आहे.

ओबीसींची जातीनिहाय जनगणनेची मागणी

ओबीसी आरक्षणाबरोबरच ओबीसी समाजाकडून वारंवार जातिनिहाय जणगणनेहीचीही मागणी करण्यात येत आहे. जातीनिहाय जनगणना झाल्यास त्याचा फायदा ओबीसी समाजाला होईल असा विश्वास ओबीसी समाजाला आहे. त्यामुळे जातीनिहाय जनगणनेची मागणीही जोर धरू लागली आहे. इंपेरिकल डेटावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वारंवार आरोप प्रत्यारोप झाल्याचं दिसून आले. इंपेरिकल डेटाच्या घोळामुळे आरक्षण रखडून पडल्याचं राज्यातल्या नेत्यांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचं घोंगड भिजत पडलं आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा तिढाही अजून सुटला नाही. त्यामुळे मराठा समाजही अनेकदा रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचं सासू सुनेचं भांडण कधी संपणार आणि आरक्षणाचे प्रश्न कधी मार्गी लागणार असा सवाल ओबीसी समाजाकडून विचारण्यात येतोय.

वकील कामगारांचे पोट भरणार नाही, एसटी संपावरून सदावर्तेंना संजय राऊतांचा टोला

खरीप अंतिम टप्प्यात तरीही शेतकऱ्यांना विमा रकमेचीच प्रतिक्षा, वाढीव विमा रकमेसाठी राष्ट्रवादीचा रास्तारोको

कतरिना कैफच्या हातावर रचली जाणार विकी कौशलच्या नावाची मेहंदी, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्!