ओबीसी नेते मराठा आरक्षणाला आव्हान देणार!
मुंबई: मराठा समाजाला एसईबीसी अर्थात विशेष प्रवर्गात आरक्षण द्यावं, अशी शिफारस मागासवर्ग आयोगाने केल्यानंतर, ओबीसी समाजात अस्वस्थता पसरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आणि ब्राह्मण संस्थांनी अहवाल तयार केल्याचा आरोपही ओबीसी नेत्यांनी केला आहे. आकाशवाणी आमदार निवासात ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार प्रकाश शेंडगे, भाजपचे माजी […]
मुंबई: मराठा समाजाला एसईबीसी अर्थात विशेष प्रवर्गात आरक्षण द्यावं, अशी शिफारस मागासवर्ग आयोगाने केल्यानंतर, ओबीसी समाजात अस्वस्थता पसरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आणि ब्राह्मण संस्थांनी अहवाल तयार केल्याचा आरोपही ओबीसी नेत्यांनी केला आहे. आकाशवाणी आमदार निवासात ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार प्रकाश शेंडगे, भाजपचे माजी खासदार हरीभाऊ राठोड, प्रा. श्रावण देवरे आणि इतर ओबीसी नेत्यांनी उपस्थिती लावली.
बैठकीत काय झालं?
महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला एसईबीसी प्रवगातून आरक्षण देत आहे, म्हणजे ओबीसी समाजाच्या आरक्षणातूनच दिलं जात आहे, असा दावा ओबीसी नेत्यांचा आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला घटनेत एसईबीसी हेच नाव आहे. म्हणजे सरकार ओबीसी समाजातील आरक्षण मराठ्यांना देत आहे, असाही दावा ओबीसी नेत्यांचा आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री पूर्णपणे फसवणूक करत आहेत. सरकारने तयार केलेला मागसवर्ग आयोगाचा अहवाल सुद्धा आक्षेपार्ह आहे. ज्या संस्थांनी हा अहवाल तयार केला, त्यामध्ये मराठा आणि ब्राह्मण संस्था होत्या. सरकार जर ओबीसीमधून आरक्षण देणार असेल, तर येत्या निवडणुकीत भाजपला ओबीसी समाज मतदान करणार नाही, असा पवित्रा ओबीसी नेत्यांनी घेतली.
मुख्यमंत्र्यांची घोषणा
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाने दिलेल्या शिफारसी सांगितल्या. त्यानुसार मराठा समाजाला एसईबीसी अर्थात विशेष प्रवर्गात आरक्षण देणार असल्याचं जाहीर केलं.
संबंधित बातम्या
मराठा समाजाला विशेष प्रवर्गात आरक्षण मिळणार : मुख्यमंत्री