इचलकरंजीमध्ये कोरोना नियंत्रणासाठी सम-विषमचा फॉर्म्युला

इचलकरंजीमध्ये दीड महिन्यापासून ठप्प झालेली वस्त्रनगरी टप्प्याटप्प्याने सुरु करण्यासंदर्भात प्रशासनाने काही नियमावली तयार केली आहे (Odd Even formula in Ichalkaranji for Corona).

इचलकरंजीमध्ये कोरोना नियंत्रणासाठी सम-विषमचा फॉर्म्युला
Follow us
| Updated on: May 10, 2020 | 5:22 PM

कोल्हापूर : इचलकरंजीमध्ये दीड महिन्यापासून ठप्प झालेली वस्त्रनगरी टप्प्याटप्प्याने सुरु करण्यासंदर्भात प्रशासनाने काही नियमावली तयार केली आहे (Odd Even formula in Ichalkaranji for Corona). त्यासाठी सम आणि विषम तारखांना दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सम तारखेस शहरातील पश्‍चिम आणि उत्तराभिमुख तर विषम तारखेला पूर्व आणि दक्षिणाभिमुख दुकाने सुरु केली जातील. दिलेल्या सूचनांचे पालन न झाल्यास संबंधित दुकान मालक आणि नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तींविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व भारतीय दंड संहिता कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच संबंधित दुकानही सील करण्यात येणार आहे.

लॉकडाउनच्या कालावधीत राज्य शासनाच्या निर्देशानुसार इचलकरंजी नगरपरिषद क्षेत्रातील दुकाने, बाजारपेठा सुरू ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. नगरपरिषद क्षेत्रातील एकल दुकाने रहिवासी भागातील दुकाने आणि रहिवासी संकुलातील दुकाने सुरु राहतील. मात्र कंटेनमेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तू अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद राहतील. जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवा वगळता मॉल/मार्केटमधील सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

सम तारखेस म्हणजेच 8,10, 12, 14, 16 याप्रमाणे शहरातील पश्‍चिमेकडे (पश्‍चिमाभिमुख) आणि उत्तरेकडे (उत्तराभिमुख) तोंड असलेली दुकाने सुरु राहतील. तर विषम तारखेस म्हणजेच 9, 11, 13, 15 याप्रमाणे शहरातील पूर्वेकडे (पूर्वाभिमुख) व दक्षिणेकडे (दक्षिणाभिमुख) तोंड असलेली दुकाने सुरु राहतील. नगरपरिषद क्षेत्रामध्ये वरीलप्रमाणे जी दुकाने/आस्थापने सुरु राहतील, त्याठिकाणी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असणार आहे. त्यामध्ये दुकाने/आस्थापना येथील सर्व उपस्थितांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक राहील.

या नियमांनुसार दुकानाच्या बाहेर 5 फूट अंतरावर उभे राहण्यासाठी गोल/चौकोनी पट्टे आखणे, 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्ती जमणार नाहीत याची दक्षता घेणे, येणार्‍या ग्राहकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करणे, स्पर्श न होता देवाणघेवाणीचे व्यवहार करणे बंधनकारक राहणार आहे. दुकानांमधील सर्व पृष्ठभाग नियमितपणे निर्जंतुक करणे देखील बंधनकारक आहे. 10 वर्षांखालील आणि 65 वर्षांवरील व्यक्ती दुकानांमध्ये येणार नाही याची दक्षता घेणे, दुकान परिसरात धुम्रपान करण्यास आणि थुंकण्यास सक्त मनाई राहील. दुकाने सायंकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत बंद राहतील.

नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

सध्या कोल्हापूर जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या नव्या निर्देशांनुसार गेल्या 2 दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व उद्योगधंदे, व्यवसाय सुरु करण्याची परवानगी दिली आहे. तसेच मालवाहतूक वाहनांना देखील परवानगी दिली आहे. मात्र त्यावेळी कोणत्याही मालवाहतूक वाहनांमध्ये चालक व त्याचा मदतनीस यांनाच वाहतूक करण्यासाठी परवानगी आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील नागरिकांना चारचाकीमध्ये 2 जण तर दुचाकी वर 1 असा नियम काढून शहर पूर्वपदावर आणले आहे. ॉ

असं असलं तरी इचलकरंजी शहरातील काही बेजबाबदार नागरिक दुचाकीवरून राजरोसपणे 2 किंवा 3 व्यक्ती फिरताना दिसत आहेत. त्यामुळे आज शहर वाहतूक शाखेच्यावतीने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. ही कारवाई चालू असल्याचे पाहताच काहींनी तेथून पळ काढला तर काही वादावादीचे प्रकारही घडले. सर्व वाहनचालकांना दंडात्मक कारवाई करुन समज देऊन सोडण्यात आले. ही कारवाई शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे इचलकरंजी शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या :

जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 174 वर, अंमळनेर शहरात शंभरीपार रुग्ण

चंद्रकांत पाटलांनी श्रीफळ वाढवले, पुण्यातून विद्यार्थ्यांच्या दोन बस कोल्हापूरला रवाना

Lockdown | हजारो मजूर पायी चालत गावाला, पुन्हा शहरात येण्यास अनेकांचा नकार

Odd Even formula in Ichalkaranji for Corona

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.