एफआरपी थकवणाऱ्यांचे साखर कारखाने बंद पाडणार; स्वाभिमानीचा साखर कारखानदारांना इशारा

राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी (रास्त आणि किफायतशीर किंमत) थकवली आहे, एफआरपीचे तुकडे केले आहेत. ते साखर कारखाने बंद पाडण्यात येतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.

एफआरपी थकवणाऱ्यांचे साखर कारखाने बंद पाडणार; स्वाभिमानीचा साखर कारखानदारांना इशारा
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 9:01 PM

कोल्हापूर : राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी (रास्त आणि किफायतशीर किंमत) थकवली आहे, एफआरपीचे तुकडे केले आहेत. ते साखर कारखाने बंद पाडण्यात येतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. (on FRP issue Raju Shetty slams sugar factory owner said will not allow to open sugar factory)

“स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापुरात 19 व्या ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वाभिमानीने वेगवेगळे ठराव संमत केले. ऊस परिषदेनंतर राजू शेट्टी यांनी माध्यमाशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले “ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी द्यायला उशीर केला. तसेच एफआरपी टप्प्याटप्प्यात दिली किंवा थकवली, त्यांच्या विरोधात मी औरंगाबाद खंडपीठात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ज्यांनी एफआरपी द्यायला 14 दिवसांपेक्षा जास्त उशीर केला, त्यांच्याकडून 15 टक्के व्याजदराने रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी आम्ही साखर आयुक्तांना करणार आहोत.” तसेच ज्या साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीची एफआरपी थकवली ते साखर कारखाने आम्ही बंद पाडणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

कृषी कायद्यांविरोधात 5 डिसेंबरला चक्काजाम आंदोलन

दरम्यान, देशात लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांना राजू शेट्टी यांना विरोध दर्शविला आहे. त्यांनी येत्या 5 डिसेंबरला चक्काजाम आंदोलन करणार असून महाराष्ट्रातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होतील असे सांगितले. तसेच राज्याचे शेतकरी देशातील शेतकऱ्यांसोबत असल्याचा संदेश या आंदोलनातून देण्यात येईल असे ते म्हणाले.  हे चक्काजाम आंदेलन 2 तासांचे असून राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरणार उतरुन कृषी कायद्यांना विरोध दर्शवणार आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानावर ऊस परिषद घेण्याचे नियोजन केले होते. त्याबाबतची तयारीदेखील जवळपास पूर्ण झाली होती. मात्र, कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने या परिषदेसाठी परवानगी दिली नव्हती. त्यांनतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. या चर्चेनंतर परिषद ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात झाला होता.

संबंधित बातम्या :

ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ, सर्व संघटनांचे एकमत, पुण्यातील बैठकीत निर्णय

ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ, सर्व संघटनांचे एकमत, पुण्यातील बैठकीत निर्णय

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार : धनंजय मुंडे

(on FRP issue Raju Shetty slams sugar factory owner said will not allow to open sugar factory)

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.