बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी एकाला अटक, विद्युत प्रवाह सोडल्यामुळे झाला मृत्यू; वनविभागाकडून चौकशी

रामटेक तालुक्यातील मौजा पांचाळा खुर्द येथे एक बिबट्या मरण पावल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानंतर त्यांनी तिथल्या परिसराला भेट दिली. त्यावेळी नेमका मृत्यू कशामुळं झाला असावा असा पेच वनविभागासमोर होता.

बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी एकाला अटक, विद्युत प्रवाह सोडल्यामुळे झाला मृत्यू; वनविभागाकडून चौकशी
बिबट्याचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 11:41 AM

नागपूर – बिबट्याच्या भीतीमुळे अनेकांनी बिबट्याचे जीव घेतल्याची उदाहरण आपण पाहतो, अशी प्रकरण नेहमी आपल्याला देशभरात पाहायला मिळतात. त्यासाठी सरकारकडून योग्य पाऊल उचलून जणजागृती करणं गरजेचं आहे. नुकतीच नागपरमध्ये (nagpur) एक घटना उघडकीस आली आहे. त्यामध्ये असं दिसतंय की, आरोपीने पुर्णपणे तयारीनिशी बिबट्याला मारला आहे. शेतातच्या चहूबाजूनी तारेचे कुंपन घेऊन त्याला विद्युत प्रवाह (Electric current) दिला असल्याने बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शनी तपासात वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्या शेताचे मालक नंदु शंकर शिवरकर यांनी वनविभागाने ताब्यात घेतले आहे. 3 दिवस त्यांना कोठडीत ठेवण्यात येणार असून आरोपीची कसून चौकशी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. ही घटना नागपूर जिल्ह्यातील रामटेक (ramtek)तालुक्यात उघडकीस आली असून तिथल्या परिसरात असलेल्या बिबट्यांचे जीवन धोक्यात असल्याचे स्पष्ट होत आहे.

असा झाला बिबट्याचा मृत्यू 

रामटेक तालुक्यातील मौजा पांचाळा खुर्द येथे एक बिबट्या मरण पावल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानंतर त्यांनी तिथल्या परिसराला भेट दिली. त्यावेळी नेमका मृत्यू कशामुळं झाला असावा असा पेच वनविभागासमोर होता. परंतु त्यांनी बिबट्याची व्यवस्थित पाहणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, बिबट्या विद्युत प्रवाहाच्या तारेला चिटकून मृत्यू झाला आहे. त्यानंतर वनविभागाने खात्री करण्यासाठी बिबट्याचे शवविच्छेदन करण्याचे ठरवले. शवविच्छेदन करत असताना ज्या गोष्टी तपासणीच्या आहेत, तेवढ्या तपासणीसाठी पाठवल्या आहेत. तसेच बिबट्याचं शवाची त्याचं परिसरात विल्हेवाट लावली आहे. विद्युप प्रवाहाचा शॉक लागून बिबट्या मेल्याचं खात्री झाल्यानंतर नंदु शंकर शिवरकर यांना ताब्यात घेतलं आहे.

मृत्यूचं वाढतं प्रमाण 

बिबट्याच्या मृत्यूची अनेक कारण आहेत, अपघात होऊन देशात आत्तापर्यंत अनेक बिबटे मेले असल्याची माहिती आहे. ‘वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेच्या आकडेवारीनुसार, 2019 ला 110 बिबट्यांच्या मृत्यूची प्रकरणं समोर आली होती. 2020 मध्ये हा आकडा 172 पर्यंत गेला होता. त्यामुळे बिबट्याचे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे आपल्या निदर्शनास येत आहे. बिबट्या आणि मनुष्य संघर्षावर तोडगा काढण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाच्या अनेकदा बैठका झाल्या आहेत, परंतु बिबट्याच्या मृत्यूचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसते. पण नागपूरात घडलेली घटना अत्यंत वाईट आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण विद्युत प्रवाहाचा शॉक देऊन बिबट्याला मारल्याचं प्राथमिक अहवालात निष्पन्न झालंय.

नागपुरातील वृक्ष गणना नव्याने करण्याचे प्रस्तावित; किती असेल शहरात झाडांची संख्या?

नागपूर जिल्ह्यामध्ये आरंभ बालसंगोपन प्रशिक्षण; 0 ते 3 वयोगटातील मुलांच्या वाढीसाठी शास्त्रीय उपक्रम

नागपूर मनपा शाळेतील सुपर 75 विद्यार्थ्यांना शिकवणी मोफत, ऑनलाईन अभ्यासासाठी आणखी काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.