One Nation One Ration | काय आहे ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना?
या योजनेअंतर्गत देशातील कानाकोपऱ्यात गरीब कोणत्याही दुकानातून आपल्या वाट्याचे (One Nation One Ration Card) धान्य घेऊ शकणार आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयाचं ‘स्वावलंबी भारत अभियान’ पॅकेज (One Nation One Ration Card) जाहीर केलं. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज (14 मे) दुसऱ्या पत्रकार परिषदेत या पॅकेजची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी देशातील गरिबांसाठी ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील कानाकोपऱ्यात गरीब कोणत्याही दुकानातून आपल्या वाट्याचे (One Nation One Ration Card) धान्य घेऊ शकणार आहे.
‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना
अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या, “प्रत्येक राज्यात ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना लागू होणार आहे. या योजनेचा लाभ 23 राज्यातील 67 कोटी लोकांना होईल. या योजनेच्या यामाध्यमातून गरिबांना कोणत्याही राज्यातील रेशन दुकानातून रेशन घेता येणार आहे.”
सध्यातरी देशात रेशन कार्डसंबंधी काही वेगळे नियम आहेत. रेशन कार्ड ज्या भागातील असेल त्याच भागातील रेशन दुकानातून संबंधित रेशन कार्ड धारकाला धान्य विकत घेता येतं. इतर कुठल्याही भागातून त्या रेशन कार्डवर धान्य घेता येत नाही. मात्र, ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना लागू झाल्यावर देशातील कुठल्याही रेशन दुकानातून कुठल्याही रेशन कार्ड धारकाला धान्य मिळणार आहे (One Nation One Ration Card).
मजुरांना पुढील दोन महिने मोफत धान्य
“प्रवाशी मजुरांना पुढील दोन महिन्यांपर्यंत रेशन मोफत मिळणार आहे. तसेच, ज्यांच्याकडे कार्ड नाही त्यांनाही 5 किलो गहू, तांदूळ आणि एक किलो चना डाळ मिळणार आहे. 8 कोटी मजुरांना याचा फायदा होणार आहे. त्यासोबत अर्थमंत्रालयातून मजुरांच्या रेशनसाठी 300 कोटी रुपये देण्यात येणार आहे. हा सर्व खर्च केंद्र सरकार करणार आहे”, असं निर्मला सीतारमन यांनी सांगितलं.
“फेरीवाल्यांसाठीही केंद्र सरकार 5 हजार कोटींची मदत करणार आहे. महिन्याभरात फेरीवाल्यांसाठी खास योजना अंमलात आणली जाईल”, असंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
“किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत दोन लाख कोटींचे कर्ज दिले जाणार आहे. याचा लाभ 2.5 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. त्यासोबत शेतकरी, मच्छीमार, दुग्धव्यवसायिकांना सवलतीत कर्ज दिले जाणार आहे”, असं निर्मला सीतारमन यांनी सांगितले.
One Nation One Ration Card
संबंधित बातम्या :
Nirmala Sitharaman | मजुरांना 2 महिने मोफत धान्य, कमी भाड्यात घर, फेरीवाल्यांसाठी 5 हजार कोटी